Sameer Sattar Abdul Sattar sarkarnama
मराठवाडा

Abdul Sameer : जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट, अब्दुल समीर यांचा अर्ज वैध

DCC Bank Election : कृषी व पणन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून संचालक पदासाठी अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

सरकारनामा ब्यूरो

सचिन चोबे

Abdul Sameer News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणूक आखाड्यात अब्दुल समीर यांची उमेदवारी कायम राहिली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कृषी व पणन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून संचालक पदासाठी अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अपात्र (अवैध) ठरविला होता. निर्णयाच्या विरोधात समीर यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केले होते.

शुक्रवार (ता.19) रोजी झालेल्या सुनावणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा अपात्रतेचा निर्णय विभागीय सहनिबंधकांनी रद्द केला. अब्दुल समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला असून, त्यांचे नाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी कृषी पणन व प्रक्रिया संस्था मतदारसंघाच्या अंतिम उमेदवार यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

महायुतीचे नेते सत्तेसाठी एकत्र?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेतली आहे. गेल्या संचालक मंडळात अध्यक्ष पदासह सत्तेची सूत्र आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात होती. 1 लाखाहून अधिक सभासद आणि आठशे कोटींवर उलाढाल असलेल्या सर्वात मोठ्या जिल्हा सहकारी बँकेवरील सत्तेसाठी महायुतीतील नेते सरसावले आहेत. ही निवडणूक महायुतीचे नेते एकत्र लढवण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT