Shivsena Vardhapan Melava: खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंची वर्धापन दिनाच्या दिवशीच मोठी घोषणा; म्हणाले,...तर मी आज शिवसेनेचं पक्षप्रमुख सोडतो!

Shivsena News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन षण्मुखानंद हॉल येथे पार पडला. यावेळी ठाकरेंनी फुटलेले खासदार, एकनाथ शिंदे,भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, काहींना वाटले असेल की दुःखं आणि कष्टानं शिवसैनिक खचून गेला असेल. पण शिवसैनिक खचलेला नाही, उलट तो अधिक पेटून उठला असल्याची भावना व्यक्त केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मी गेले 10 ते 12 वर्षे तुमच्या सर्वांच्या शिवसेनेचं नेतृत्व करत आहे. पण गद्दारांकडून जे काही माझ्यावर आता आरोप होताहेत, ते खरे आहेत का ते सांगा. तर मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला या क्षणी तयार आहे. मी आज पक्षप्रमुख पद सोडायला तयार असल्याचं मोठं विधान माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. तसेच त्यांनी यावेळी माझी सोन्यासारखी शिवसेना कोणत्या चोर किंवा गद्दारांच्या हाती जाता कामा नये. माझ्या जागी तुमच्यातला एखाद्या सामान्य शिवसैनिकाला त्या पदावर बसवा. मला नेतृत्त्वाची कोणतीही हाव नाही. मी कोणत्याही क्षणी शिवसेना पक्षप्रमुख हे पद सोडायला तयार आहे, तुमच्यातला एखादा शिवसैनिक पक्षप्रमुख झाला तरी मला आनंदच होईल असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन षण्मुखानंद हॉल येथे पार पडला. यावेळी ठाकरेंनी फुटलेले खासदार, एकनाथ शिंदे,भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, काहींना वाटले असेल की दुःखं आणि कष्टानं शिवसैनिक खचून गेला असेल. पण शिवसैनिक खचलेला नाही, उलट तो अधिक पेटून उठला असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी कोणाला भेटत नाही. आदित्य फिरत नाही.पण जर मी भेटत नव्हतो, तर गधड्या तू निवडून कसा आलास. प्रत्येक लोकसभेत सहा ते दहा सभा घेतल्या. तेव्हा निवडून आले. मी निवडून आणून तुला विधानसभेत पाठवलं,खुर्ची दाखवली, आमदार केलं, मंत्री केलं. हा माझा गर्व असेल. मी गर्व दाखवणार नसल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्या भाषणावेळी उद्या समजा, शिवसेना निवडणुकाच लढवणार नसेल. तर मग हे काय करतील? असा नवा बॉम्ब टाकला. तर तुम्ही राहणार का माझ्यासोबत? अशी विचारणाही त्यांनी शिवसैनिकांकडे केली. ते म्हणाले, कारण मरमर-मेहनत माझ्या शिवसैनिकांनी, तुम्ही करायची,आणि यांचे खोक्यावर खोके. शेतकऱ्यांना हमीभाव नाही, पण खासदारांचे हमी भाव ठरल्याचाही टोला ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
Amol Kolhe News : नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला राज्य सरकारचाच ब्रेक? मंजुरीनंतरही प्रकल्प रखडला!, खासदार कोल्हेंचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com