Cm Eknath Shinde-Abdul Sattar News, Aurangabad
Cm Eknath Shinde-Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांचा फोन अन् सत्तार बैठक रद्द करून नागपूरला ...

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर १९ गुंठे गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने एका नागरिकाच्या नावावर केल्याच्या प्रकरणावरून तत्कालीन महसुल राज्यमंत्री तथा विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणावरून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी (ता. २६) गोंधळ झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना फोन केला व सत्तार सिल्लोडमधील कृषी महोत्सवाची बैठक, शहरातील पत्रकार परिषद अचानक रद्द करून नागपूरला रवाना झाले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना न्यायालयाच्या आदेशाविरोधात जाऊन गायरान जमीन एका नागरिकाला मंजूर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्या या निर्णयावर (Nagpur) नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. हे प्रकरण सोमवारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अधिवेशनात उपस्थित केले. त्यानंतर विरोधीपक्षाने सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दरम्यान, सोमवारी सत्तार हे सिल्लोडमध्ये एक जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या तयारीत होते. मात्र, अधिवेशनात त्यांच्या वादग्रस्त निर्णयावरून गदारोळ होताच न मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तार यांना फोनवर संपर्क साधला. काही वेळ चर्चा झाल्यानंतर सत्तार यांनी कृषी महोत्सवाची बैठक तडकाफडकी रद्द केली.

सत्तार यांची सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषदही होणार होती. तीही रद्द करण्यात आली. तब्बल ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. २८९ अन्वये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणले.

सत्तारांची पाच प्रकरणे

-३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीररीत्या दिली.

- सविता थोरात यांची मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद रत्नागिरी, कोकण प्रादेशिक विभागीय आयुक्त या प्रकरणातही कोकण विभाग आयुक्त व अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन सत्तार यांनी निर्णय घेतला.

-औरंगाबाद येथील जयेश इन्फ्रा सावंगी नावाच्या कंपनीला सत्तार यांनी अधिकार नसतानाही नियमबाह्य व बेकायदेशीर आदेश दिले.

-औरंगाबादमध्ये अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपट्टा बदलून देण्याचे काम केले.

-औरंगाबाद जिन्सी, येथील कृषी बाजार समितीच्या जागेबाबतही सत्तार यांनी कार्यक्षमतेबाहेर जाऊन चुकीचा निर्णय दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT