Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : कृषीमंत्री सत्तार दोन तास रमले सत्संगात...

Marathwada : यातून आत्मिक समाधान व उर्जादायी प्रेरणा मिळाल्याचेही सत्तार म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News: बिडकीन येथे सुरू असलेल्या ५६ व्या वार्षिक निरंकारी संत समागम सोहळ्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) चांगलेच रमले. दोन तास त्यांनी सत्संगाला हजेरी लावत सद्गुरु माता सुदीक्षाजी यांचा आशिर्वादही घेतला. निरंकारी मिशनचे सचिव जोगेंदर सुखेजा तसेच विवेक सिंग यांनी सत्तार यांचे स्वागत केले.

आज पुज्यनीय बाबा हरदेवजींचे स्मरण होत आहे. प.पु. बाबा हरदेवजी यांच्या गुरू वाणीतून सारेच मंत्रमुग्ध होत असतं. (Marathwada) त्यांच्याच वारसा सद्गुरू माता सुदिक्षाजी यांच्या माध्यमातून पुढे चालू असल्याचे मत सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले. (Aurangabad) मानवता, सामाजिक सदभावना, राष्ट्रीय एकात्मता व सकारात्मक विचार सत्संगच्या माध्यमातून मिळत असतात.

जवळपास दोन तास समागम सोहळ्यास उपस्थित राहाता आले. यातून आत्मिक समाधान व उर्जादायी प्रेरणा मिळाल्याचेही सत्तार म्हणाले. निरांकारी माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमित चांदनाजी यांचे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समागम सोहळ्याला हजेरी लावून आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर सत्तारांनी देखील यो सोहळ्याला हजेरी लावली. औरंगाबादेत पहिल्यांदाच २७ ते २९ जानेवारीदरम्यान या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आज समारोपाला मुख्यमंत्री उपस्थित होते. बिडकीन डीएमआयसीतील तीनशे एकर जागेवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी तीन लाख चौरस फुटांचा सभामंडप देखील उभारण्यात आला होता. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह देशभरातील आणि विदेशातील भक्त उपस्थित होते. राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी या भव्य सोहळ्यास भेट देऊन, सुदीक्षा माताजींचे पूजन केले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील संतांचे आशिर्वाद घेतले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT