Shivsena News : बदलीसाठी पैसे घेतले, खैरेंच्या मुलाची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल..

Aurangabad : ऋषीकेश खैरे यांनी एका व्यक्तीकडून २ लाख रुपये घेतल्याचा उल्लेख या ऑडिओमध्ये आहे.
Yuvasena Activist Rushikesh Khaire News, Aurangabad
Yuvasena Activist Rushikesh Khaire News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : ठाकरे गटाचे मोठे नेते व युवासेनेचा पदाधिकारी असलेला त्यांच्या मुलगा एका व्हायरल कथित ऑडिओ क्लीपमुळे अडचणीत आले आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे चिरंजीव ऋषीकेश खैरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देतो म्हणून एका व्यक्तीकडून दोन लाख रुपये घेतल्याचा उलगडा या ऑडिओ क्लीपमधून होत आहे. बदली न केल्यामुळे माझे पैसे परत करा, असा तगादा संबंधित व्यक्ती करत असल्याचे यातून स्पष्ट होते.

Yuvasena Activist Rushikesh Khaire News, Aurangabad
Aimim : वंचित-शिवसेनेची युती होताच, इम्तियाज यांच्याकडून राष्ट्रवादी-काॅंग्रेसला टाळी ?

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या (Marathwada) काळात पैसे घेवून बदल्या केल्या जात होत्या का? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. खैरे यांच्या चिरंजीवाच्या या व्हायरल ऑडिओमुळे ते देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Shivsena) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषीकेश हे युवासेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना एका अधिकाऱ्याची वन विभागात बदली करून देण्यासाठी ऋषीकेश खैरे यांनी एका व्यक्तीकडून २ लाख रुपये घेतल्याचा उल्लेख या ऑडिओमध्ये आहे. या ऑडिओमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ऑडिओमध्ये सदरील व्यक्ती ऋषीकेश यांच्याकडे दोन वर्ष झाली बदलीचे कामही झाले नाही आणि माझे पैसेही परत मिळाले नाही असे सांगत आहे.

मी घरातील सोनं-चांदी विकून दोन लाख रुपये दिले होते, तुम्ही कामही केले नाही आणि पैसेही देत नाही, त्यामुळे मी खूप अडचणीत आहे. तुम्ही मला हलक्यात घेत आहात, आता एकच तारीख सांगा आणि माझे पैसे परत द्या, अशी मागणी सदर व्यक्ती करत आहे. यावर ऋषीकेश खैरे त्या व्यक्तीला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुला शंभर टक्के पैसे देवून टाकतो, असे आश्वासन देतात. हा सगळा संवाद ऑडिओमध्ये आहे.

ऋषीकेश खैरे व संबंधित व्यक्तीमध्ये झालेला संवाद..

ऋषी खैरे: हॅलो

विजय: बोला भाऊ

ऋषी खैरे: कुठे आहे तू...

विजय: इकडे शेंद्राला होतो

ऋषी खैरे: आ...

विजय: शेंद्राला

Yuvasena Activist Rushikesh Khaire News, Aurangabad
Supriya Sule On Devendra Fadnavis: जमत नसेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे संतापल्या..

ऋषी खैरे: अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झाले

विजय: अरे हौ ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये..काय बोलणार आहे बरं तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही..तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले

ऋषी खैरे: आज काय तारीख आहे, 23 तारीख आहे...पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो

विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.

ऋषी खैरे: हंड्रेड पर्सेंट होईल

विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोने चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही..माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे

Yuvasena Activist Rushikesh Khaire News, Aurangabad
Bihar Politics: 'मरण आले तरी चालेल पण, मी भाजपमध्ये..'; नितीश कुमार यांचे मोठं विधान

ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो

विजय: नै काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी

ऋषी खैरे: अच्छा दिलेले आहे का?

विजय: हो

ऋषी खैरे: पैसे देऊन टाकतो

विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरच लय परेशानी चालू आहे माझी

ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो

विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी

ऋषी खैरे: होय

विजय: बरं ठीक आहे चालेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com