Minister Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : शेतकऱ्यांनो चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी..

Marathwada : नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील.

सरकारनामा ब्युरो

Farmers News : राज्यात आज काही ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त (Farmers) शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. तसेच, नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील,असेही सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यासह राज्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. (Abdul Sattar) मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. (Eknath Shinde) यामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यासह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची ग्वाही देखील अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याअनुषंगाने अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT