Chhatrapati Sambhajinagar : दोन महिन्यांपुर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची सत्ता असलेल्या सिल्लोड नगर परिषदेने (Sillod) आकारलेल्या बेकायदेशी मालमत्ता कराच्या विरोधात भाजपने मोर्चा काढला होता. एवढेच नाही तर शहर बंदची हाकही दिली होती. आपल्या सरकारमधील मंत्र्यांच्याविरोधात मोर्चा आणि बंद पुकारल्यामुळे हे आंदोलन राज्यभर गाजले होते.
आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाजपच्या आंदोलनातील हवा काढतांनाच सिल्लोडकरांनी सहानुभूती मिळवणारा निर्णय घेत राजकीय खेळी केली आहे. (Bjp) शहरातील माजी सैनिक, शहिद जवांनांच्या विधवांच्या नावावरील मालमत्तेचा कर पुर्णपणे माफ करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.
त्यामुळे सरसकट सर्व नागरिकांच्या करामध्ये कपात न करता मोजक्या माजी सैनिक, शहिद जवांनांच्या पत्नींच्या मालमत्ता कारांना माफी देत सत्तार यांनी भाजपला दणका दिला आहे. सिल्लोड नगर परिषद हद्दीतील आजी - माजी सैनिक त्याचप्रमाणे शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ताकरात पूर्ण माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा राजश्री निकम यांनी दिली.
मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद करून सैनिकांचा सन्मान केला असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे. सैनिक हे प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे देशाचे सरंक्षण करतात. सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि सैनिकांच्या सन्मानार्थ सिल्लोड नगर परिषदेने आजी-माजी सैनिक व विरपत्नी यांना मालमत्ता करात सुट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपनगराध्यक्ष समीर सत्तार यांनी म्हटले आहे.
शहरात ३५ ते ४० आजी- माजी सैनिकांच्या मालमत्ता आहे. याबाबत सविस्तर माहिती संकलित करणे सुरू असून नगर परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आजी-माजी सैनिकांनी नगर परिषदेच्या कर संकलन विभागाकडे पुरावा सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.