<div class="paragraphs"><p>Raosaheb Danve-Abdul Sattar</p></div>

Raosaheb Danve-Abdul Sattar

 

Sarkarnama

मराठवाडा

Abdul Sattar : रावसाहेब दानवेंनी माझ्याशी गद्दारी केली, त्याची शिक्षा योग्यवेळी देईन..

सरकारनामा ब्युरो

भोकरदन :रावसाहेब दानवे यांनी मी मदत केली हे जगजाहीर आहे, पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्याशी गद्दारी केली (Raosaheb Danve) हे ही लपून राहिलेले नाही. अशा गद्दारांना आपण योग्य वेळी शिक्षा करू, असा इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी रावसाहेब दानवे यांच्या अंगणात म्हणजेच भोकरदनमध्ये येऊनच दिला. (Shivsena)

भाजपला सर्वसमावेशक विकास साधता आला नाही, ते फक्त जातीवाद करतात असा आरोप करतांनाच भोकरदनमध्ये येतांना इथले खड्डेच आपले स्वागत करतात, असा टोलाही सत्तार यांनी दानवेंना लगावला. भोकरदन येथील ग्रामविकास विभागाअंतर्गत ५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले.

अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर तसेच माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहबे दानवे यांच्या अंगणात आणि स्वतःच्या सासुरवाडीत आलेल्या सत्तार यांनी दानवे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

सत्तार म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जनहितार्थ निर्णय घेवून राज्यात सर्वसमावेशक विकास साधत आहे. भाजपला त्यांच्या सत्ता काळात हे जमले नाही, भोकरदनला येताच पाहिले रस्त्यातील खड्डे स्वागत करतात. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकार खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास साधत आहे.

तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालविणे इतके सोपे नाही ,मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांनी ही किमया करून दाखविली. त्यांच्याच नेतृत्वाखाली आता देशभरात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. जनहितार्थ काम करण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे देशातील क्रमांक एक चे मुख्यमंत्री ठरले आहेत.

भाजप केवळ जातीवादाचा मुद्दा पुढे करून त्याआड सामान्यांच्या प्रश्नांपासून दूर जात असल्याचे सत्तार म्हणाले. दुसरीकडे राज्यसरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्ज माफी, कोरोना काळात विविध उपाययोजना राबवून विकास साधत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांचे सरकार आहे.

मी रावसाहेब दानवे यांना मदत केली हे जगजाहीर आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्यासोबत गद्दारी केली हेही जगजाहीर आहे.'गद्दारोकी सजा वक्त पे दियी जाती है' असा सूचक इशाराही सत्तार यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT