State Minister Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

अब्दुल सत्तार म्हणतात, संकटकाळतही महसुल विभागाचे काम कौतुकास्पद

(State Minister Abdul Sattar appreciate Revenue Department) घरपोच सातबारा उताराचे वाटप आणि ८-अ वर आधार व मोबाईल क्रमांक नमूद करणे महत्त्वाचे का आहे, अशा अनेक विषयांवर सत्तार भरभरून बोलले.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : दीड वर्षीपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि त्यानंतर झालेल्या चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि गारपिटी सारख्या निसर्गाच्या अवकृपेमुळे सर्वच अडचणीत सापडले आहेत. मात्र अशा अडचणीच्या काळातच महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम खरंच कौतुकास्पद असल्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

पुणे येथे यशोदा प्रबोधनीत सुरू असलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महसूल परिषदेच्या निमित्ताने राज्यमंत्री सत्तार यांनी महसूल विभागा समोरची आव्हाने, समस्या आणि त्यावरील उपाययोजना या विषयांवर आपले मत मांडले.

बिनशेती परवानगीचे नियम काय, त्यासाठी काय केले पाहिजे, वाळू व गौण खनिजाचा संबंधी असलेल्या सुधारित धोरणानुसार काय कार्यवाही करणे गरजेचे आहे, लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी प्रभावीपणे कशा पद्धतीने करायची, नोंदणी व मुद्रांक विषयक कामकाज, तुकडाबंदी तसेच इतर कायद्याखालील निर्बंध आणि मूल्यांकनाची कार्यपद्धती काय आहे याबद्दल सत्तार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

ई पिक पाहणी कार्यक्रम प्रभावीपणे कशा पद्धतीने राबवता येईल, घरपोच सातबारा उताराचे वाटप आणि ८-अ वर आधार व मोबाईल क्रमांक नमूद करणे महत्त्वाचे का आहे, अशा अनेक विषयांवर सत्तार भरभरून बोलले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT