Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Politics : "तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही पण..."; मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या शिंदेंच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Abdul Sattar On ministership : "मी शुन्यातून राजकारणात आलो आहे. पण लक्षात ठेवा, 'कुछ देर तक खामोशी है, फिर कानो मे शोर आयेंगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा तो दौर आयेगा'; काही लोक जसा नाला खडखड करतो, तसं खडखड करू लागले आहेत."

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News, 02 Jan : जोपर्यंत शिंदे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्यांचाच राहणार, कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी तुमचा आदेशाचं पालन करणार, असं म्हणत शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

सत्तार (Abdul Sattar) यांना नवीन महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे ते सध्या नाराज असून ते शिंदेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच त्यांनी अडीच वर्षानंतर मी पुन्हा मंत्रिमंडळात असणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवाय जोपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत शिवसेनेत असणार, ज्या दिवशी त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल त्या दिवशी तुम्ही म्हणाल तो निर्णय मी घेईल, असं सूचक वक्तव्य देखील केलं आहे. त्यामुळे सत्तार मंत्री होणार पण कोणत्या पक्षातून होणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

छत्रपती संभाजीनगरात अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी 'मी पुन्हा येईन' असा विश्वास व्यक्त केला. ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, "तुम्हालाही अडीच वर्ष थांबवावे लागणार आहे. या अडीच वर्षांत कुठे कामावर कमी पडणार नाही, याची ग्वाही देतो. त्यानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहे."

दरम्यान, त्यांनी काही लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात, काही लोक म्हणतात सिल्लोडला येणार, एकाला घरी बसवलं आता दुसरा येत आहे. पण, मी संभाजीनगरमध्ये येणार आणि गुंडगिरी सपंवणार, मंत्री असल्यावर कुणीही बोलणार असं म्हणत सत्तारांनी नाव न घेता संजय शिरसाटांवर हल्लाबोल केला.

तसंच यावेळी त्यांनी शेरोशायरी देखील केली. ते म्हणाले मी शुन्यातून राजकारणात आलो आहे. पण लक्षात ठेवा, 'कुछ देर तक खामोशी है, फिर कानो मे शोर आयेंगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा तो दौर आयेगा'; काही लोक जसा नाला खडखड करतो, तसं खडखड करू लागले आहेत.

पण, जोपर्यंत शिंदे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्यांचाच राहणार, कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी तुमचा आदेशाचं पालन करणार, अजून देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांचा माझ्यावर विश्वास माझ्यावर आहे. पद येतात आणि जातात, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT