
Bihar News: बिहारचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय भविष्याबाबत मोठा दावा केला आहे. राज्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच तेजस्वी यादव यांनी नवीन वर्षात नवीन सरकार बनवणार असल्याचाही दावा केला आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं आहे की, नितीश कुमारांसाठी आता महाआघाडीची सर्व दरवाजे बंद झाले आहेत.
बिहारमध्ये (Bihar) आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. नवीन वर्षांच्या निमित्त नेते मंडळींच्या राजकीय वक्तव्यांमध्ये आश्वासनांची झलक दिसली. बुधवारी मीडियाशी बोलताना तेजस्वी यादव यांनी नवीन वर्षांत केलेल्या संकल्पाबाबत सांगितले. शिवाय, मुख्यमंत्री नितीश कुमारांना शुभेच्छाही दिल्या आणि इशाऱ्या इशाऱ्यातच निशाणाही साधला. त्यांनी ही देखील घोषणा केली की नव्या वर्षांत नवीन सरकार बनेल.
नवीन वर्षाबद्दल तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी म्हटले की, आम्ही संकल्प केला आहे की यावेळी बिहारमधून बेरोजगारी आणि स्थलांतर संपवू. आम्ही असे सरकार बनवू जिथे शिक्षण, औषधी, कमाई, सिंचन, सुनावणी आणि कारवाई असेल. जिथे अधिकारशाही संपुष्टात आणली जाईल. जर सर्वांचा आशीर्वाद आमच्यासोबत असेल तर आम्ही या संकल्पात नक्कीच यशस्वी होवू. या नवीन वर्षांत आम्हाला बिहारला पुढे न्यायचे आहे.
तसेच मुख्यमंत्री नितीश कुमारांवर (Nitish Kumar) निशाणा साधत तेजस्वी यादव यांनी म्हटले की, या वर्षी 'नितीश चाचा' यांना निरोप देणे निश्चित आहे. ते कोणाशी बोलत आहेत, काही समजत नाही. बिहारमध्ये 20 वर्षांपासून जनतेने त्यांना संधी दिली, आता ते थकले आहेत. बिहारमधून एनडीए आणि बेरोजगारी यांचे जाणे निश्चित आहे.
याशिवाय तेजस्वी यादव यांनी हेही म्हटले की, शेतात 20 वर्षांपर्यंत एकाच प्रकारचे एकच बी पेरले तर जमीनही खराब होते आणि पीकही येत नाही. आता नवीन ब्रॅण्डचे नवीन बी लावण्यची वेळ आली आहे, यामुळे पीकही जोमात येईल आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्यही उज्ज्वल असेल. नवीन वर्षांत बिहारला पुढे न्यायचे असेल तर नवीन सरकारला आणावे लागेल.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.