MLA Abdul Sattar News  Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : पुढची विधानसभा निवडणुक मी लढवणार नाही! अब्दुल सत्तारांची गुगली की निर्णय?

Abdul Sattar will not contest the next assembly elections : मंत्रीमंडळातून डावलल्यानंतर नुकतेच अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरात मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. शिवसेना, धनुष्यबाण, एकनाथ शिंदे यांचे नाव, फोटो वगळून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे शिवसेनेमध्ये नाराजी होती.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुढची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून त्यांचा अवघ्या दोन हजार मतांनी विजय झाला होता. विरोधी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर यांच्यासह महायुतीने त्यांच्या या विजयावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, आज मतदारसंघातील अंभई येथील एका कार्यक्रमात सत्तार यांनी पुढची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचवाल्या गेल्या आहेत. राज्यात महायुतीची सत्ता येऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रीमंडळात मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांना यावेळी मात्र वगळण्यात आले.

संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली. त्यामुळे प्रचंड नाराज आणि पक्षापासून अंतर राखून असलेल्या अब्दुल सत्तारांचा हा नवा डाव आहे की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. मंत्रीमंडळातून डावलल्यानंतर नुकतेच अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरात मोठे शक्तीप्रदर्शन केले होते.

शिवसेना, धनुष्यबाण, एकनाथ शिंदे यांचे नाव, फोटो वगळून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे शिवसेनेमध्ये नाराजी होती. एकनाथ शिंदे यांनाही अब्दुल सत्तार यांचे हे शक्तीप्रदर्शन आवडले नव्हते. अब्दुल सत्तार यांनी आता आपले सगळे लक्ष मतदारसंघावर केंद्रीत केले आहे. काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांच्याशी जवळीक साधत सत्तार स्वपक्षाला सूचक इशारा देऊ पाहत आहेत.

अडीच वर्षाने मंत्रीपदाची पुन्हा संधी दिली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी राजकारणात अडीच वर्षात काहीही होऊ शकेत? असे सांगत आपली थांबण्याची तयारी नसल्याचा इशारा सत्तार यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे सांगत चाचपणी सुरू केली की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT