Minister Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांचं टेन्शन पुन्हा वाढणार? आता 'हे' प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

Abdul Sattar News : शासनाची दिशाभूल करत चुकीच्या पद्धतीनं....

सरकारनामा ब्यूरो

Abdul Sattar News : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मागील शुक्लकाष्ठ काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाही. सत्तार हे आजपर्यंत कायमच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहे. हिवाळी अधिवेशनात गायरान जमीन वाटप प्रकरण,कृषिमहोत्सवावेळी अधिकार्यांना दिलेलं वसुली टार्गेट यांसारख्या विविध प्रकरणात सत्तारांचं नाव पुढं आल्यानं विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सत्तारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार( Abdul Sattar) यांच्या शाळांची नावे राज्य शासनाची दिशाभूल करून शिष्यवृत्ती मिळविलेल्या शाळांच्या यादीमध्ये समाविष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा शिक्षण विभागाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील काही शाळांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शाळांची देखील नावं असल्यानं पुन्हा त्यांच्यासमोर नवं अडचण उभी राहिली आहे. यामुळे सत्तार यांना विरोधक घेरण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाची दिशाभूल करत चुकीच्या पद्धतीनं काही शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली असून, ती तात्काळ वसूल करून शासन खाती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाची दिशाभूल करून शिष्यवृत्ती मिळविलेल्या शाळांच्या यादीमध्ये सत्तार यांच्या अनेक शैक्षणिक संस्था, शाळांची नावं समाविष्ट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला आहे. तब्बल 253 विद्यार्थ्यांकडून घेतलेली शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी काही केल्या थांबत नाहीत. आधी गायरान जमीन प्रकरण, त्यानंतर कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याचा आरोप यामुळं आधीच अडचणीत असलेल्या कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कारण, त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत थेट सीबीआयकडे दोन वेगवेगळ्या तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी सत्तार यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह एकूण पाच जणांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT