BJP National President : कोण होणार भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष? पंतप्रधान मोदी घेणार महत्त्वाचा निर्णय

16 आणि 17 जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.
BJP National President :
BJP National President :

BJP National President : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी भाजप मुख्यालय आणि एनडीएमसीमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांसह सुमारे 350 कार्यकारिणी सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नरेंद्र मोदी भाजपच्या (BJP) नव्या अध्यक्षांची नियुक्ती करु शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विशेष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यावर सहमती होण्याची शक्यता आहे. नड्डा यांचा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपत आहे आणि संघटनेत कोणतीही निवडणूक न झाल्यामुळे त्यांना पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदी राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

BJP National President :
Jayprakash Raval News; मतदारसंघासाठी चारशे कोटींचा निधी आणला!

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 आणि 17 जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीचा मुख्य उद्देश आगामी 2023 च्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरवणे हा आहे. या बैठकीत भाजप आर्थिक, राजकीय, गरीब कल्याण आणि भारताचे G20 अध्यक्ष हे चार मुख्य ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

त्याचबरोबर ज्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला त्याबाबतही चर्चा आणि नियोजन करण्यात येणार आहे. भाजपच्या 160 अवघड मतदारसंघ आणि या जागांवर झालेला पराभव यावरही चर्चा होणार आहे. तसेच, आगामी काळात नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर अशा 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होणार आहेत, यावरही या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com