Majalgaon School student Case : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेत साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील शिक्षकास पोलिसांनी रविवारी (ता. सहा) अटक केली आहे. राहुल वायखिंडे (मूळ रा. ब्रह्मगाव ता.कोपरगाव जि.अहील्यानगर) असे आरोपीचे नाव असून त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान संस्थाचकाकासह आरोपींवरा कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी माजलगाव बंदचे आवाहन केले आहे.
बदलापूरप्रमाणे राज्यात शाळेत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरूच असून बीड(Beed) जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील लहान मुलीवर अत्याचाराची घटना २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान घडली. या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी (ता. चार) अज्ञात व्यक्ती विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
माजलगाव शहरातील शाळेत पीडित विद्यार्थीनीवर एका अज्ञात इसमाने २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान डबा खाल्यानंतर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर चिमुरडी ताप येऊन आजारी पडल्यानंतर तिच्यावर दवाखान्यात उपचार करण्यात आले. घरी आल्यावर तिने शाळेत घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगून, पांढरे कपडे घातलेला माणसाला मी ओळखते असेही सांगितले.
या घटनेनंतर चिमूरडीच्या पालकांनी माजलगाव शहर पोलीस(Police) ठाण्यात गुरूवारी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गून्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चू, पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी सदरील शाळेची चौकशी करून तेथील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्या शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली. त्या सर्व शिक्षकांचे फोटो त्या अल्पवयीन चिमुरडीला दाखवल्यानंतर तिने आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षक राहुल वायखिंडे यास तत्काळ अटक केली आहे. दरम्यान या आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायदंडाधिकारी धर्माधिकारी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाचे आता तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. या घटनेचा सखोल तपास करून यात सहभागी असलेल्या संपूर्ण आरोपींना व संस्थाचालकांना कडक शासन करण्यात यावे, यासाठी माजलगाव शहरवासीयांतर्फे सोमवारी (ता. सात) माजलगाव शहर बंद ठेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . हनुमान चौक भागातून हा मोर्चा शहर पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे निवेदन नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात देण्यात दिले आले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.