Pune Crime Sexual Assault Video: पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती; सहा वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचार, बसचालकच...

Six yearold girl Sexual assault school bus driver : चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या मैत्रीणीवर देखील लैंगिक अत्याचार केला. 45 वर्षीय नराधम स्कूल बस चालकावर वानवडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sexual Assault
Sexual Assaultsarkarnama
Published on
Updated on

Sexual Assault News : बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर तशीच घटना पुणे Pune शहरातील वानवडी परिसरता घडल्याचे उघडकीस आली आहे. चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या मैत्रीणीवर लैंगिक अत्याचार केला.

अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधम स्कूल बस चालकावर वानवडी पोलिस Pune Police स्थानकात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. बस चालक सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून अत्याचार करत होता.

आरोपी स्कूलचालक हा एका नामांकित शाळेतील School विद्यार्थ्यांना खासगी बसमधून शाळेत सोडण्याचे काम करत होताय आरोपीने बसमध्ये दोन्ही पीडित चिमुरडींना पुढच्या सीटवर बसवून त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याचीही माहिती आहे.

Sexual Assault
Ajit Pawar : मुलींवरील अत्याचार प्रकरणानंतर अजितदादा 'अ‍ॅक्शन मोडवर', बारामतीसाठी 'शक्ती अभियान'

आरोपीने मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केला. तसेच याविषयी या विषयाची कोणाला न सांगण्याची धमकी देखील दिली. लहान मुलीला त्रास होत असल्याने तिच्या पालकांनी तिची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्माविषयी चिमुरडीने आईला सांगितले.

Sexual Assault
Election : राज्यात निवडणुकांचा डबल धमाका, 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मुहुर्त ठरला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com