Mla Dhnanjay Munde-Cm Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

Dhnanjay Munde Letter To Cm News : परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तात्काळ मान्य करा..

Ncp : याच शैक्षणिक वर्षात संबंधित पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करावी.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील निवडक ५० विद्यार्थ्यांना 'सारथी' मार्फत परदेश शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. (Dhnanjay Munde Letter To Cm News) मात्र सदरचा प्रस्ताव नोव्हेंबर २०२२ पासून नियोजन विभागात प्रलंबित आहे.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ही शिष्यवृत्ती मिळेल या आशेने परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी शासनाच्या निर्णयाकडे आणि जाहिरातीकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. (Dhnanjay Munde) राज्य शासनाने सदर प्रस्ताव तात्काळ मान्य करून तातडीने जाहिरात प्रसिद्ध करावी.

याच शैक्षणिक वर्षात संबंधित पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे केली. (Marathwada) दरम्यान, धनंजय मुंडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्याय मत्री असतांना त्यांनी काही निर्णय घेतले होते.

त्यापैकी एक म्हणजे अनुसूचित जाती-जमातीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपये ठेवण्यात आली. यापूर्वी ही मर्यादा नसल्याने सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याने या योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याची टीका या योजनेवर केली जात होती.

यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारीत १ ते ३०० पैकी पहिल्या १०० विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा नव्हती व १०१ ते ३०० पर्यंत ६ लाख रुपये ईतकी उत्पन्न मर्यादा होती. परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती - जमातीच्या १ ते १०० क्रमवारी असलेल्या विद्यार्थ्यांना कौटुंबिक उत्पन्नाच्या अटीशिवाय लाभ देण्यात येत होता. परंतु यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना लाभ मिळतो आणि गोरगरीब व हुशार असलेले विद्यार्थी वंचित राहतात, यामुळे या शिष्यवृत्ती योजनेला केंद्र सरकार, ओबीसी विभाग तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या धर्तीवर सरसकट उत्पन्नाची मर्यादा घालावी अशी मागणी करण्यात येत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT