Bjp : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने `संपर्क से समर्थन` अभियान राबविण्यात येत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी या अभियानाची सुरवात परळी शहरातून केली. (Pankaja Munde News) विविध भागातील नागरिक, छोटे व्यापारी, दुकानदार यांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या वतीने २० ते ३० जून या कालावधीत राज्यभर `संपर्क से समर्थन` अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सुरवात केली. सर्व सामान्य नागरिकांपासून ते भाजी विक्रेता, लाँड्री दुकानदार, फुल विक्रेते यांच्या त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील नऊ वर्षात केलेली कामगिरी आणि राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे पत्रक त्यांनी स्वतः नागरिकांना वितरीत केले. (Bjp) तसेच मोदींना समर्थनासाठीच्या मोबाईल क्रमांकावर मिस्ड काॅल करण्याचे आवाहन नागरिकांना केले. (Beed News) या आवाहनास प्रतिसाद देत अनेकांनी पंकजा यांच्यासमोरच मोबाईलवरून मिस्ड काॅल करून पंतप्रधानांना समर्थन दिले.
शहर व तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपने राज्यभरात संपर्क मोहिम राबवत केंद्र सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोचवणे सुरू केले आहे. यासाठी देशपातळीपासून अगदी गावातील पदाधिकारी, भाजप कार्यकर्त्यांना या मोहिमेत झोकून देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.
पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रीय सचिव म्हणून मध्य प्रदेश राज्याची जबाबादारी आहे. काही दिवस येथील कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर आता पंकजा मुंडे या आपल्या गावात म्हणजे परळीत संपर्क से समर्थन अभियानात सहभागी झाल्या आहेत. मेळावे, सभा, बैठकांमधून दिसणाऱ्या पंकजा आता थेट जनतेत फिरतांना दिसत असल्याने त्यांच्या मोहिमेला प्रतिसाद देखील चांगला मिळत असल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.