Parbhani News, 11 Feb : भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील पोलिसांना माफ करा, त्यांच्यावर गु्न्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका', अशी विनंती सुरेश धस यांनी केली आहे.
त्यांच्या या वक्तव्यावरू विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. धसांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धस हे सरकारचे दूत म्हणून त्या ठिकाणी गेले होते. सरकारने असे दूत पाठवण्याचं काम कशाला करायचं? असा सवाल उपस्थित केला. तसंच ते एवढे क्षमाशील असतील सर्व तुरूंगातील आरोपींना सोडून द्या, असंही आव्हाड म्हणाले.
तर आव्हाडांच्या या वक्त्यावरून धस चांगलेच आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल ओतण्याचा धंदाच कळतो का? हिंमत असेल तर आव्हाड यांनी सोमनाथ सूर्यवंशीसाठी मुंबई आणि ठाण्यात लाखोंचे मोर्चे काढावेत, असं आव्हान धसांनी दिलं.
माध्यमांशी बोलताना सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले, मुळात परभणीची घटना घडल्यानंतर मी स्वत: पहाटे अडीच वाजता सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली. मी सर्वांचं सांत्वन करण्याचं काम केलं. बाकीच्या लोकांनी केलं की नाही मला माहीत नाही. मात्र, मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य आहे की आयोग्य? आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा कळतो का? राज्यातील सामाजिक स्वास्थ राहिलं पाहिजे की नको?
लाँग मार्च मुंबईत येण्याआधीच नाशिकमध्ये थांबल्यामुळे आव्हाडांना पोटशूळ उठला असं वाटतं आहे, अशा शब्दात त्यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला. तसंच आव्हाड हेच फक्त फुले, शाहू, आंबेडकरवादाचे ठेकेदार नाहीत. आम्हीही त्याच विचाराचे आहोत. हे प्रकरण कुठे तरी थांबलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणात सकारात्मक बाजू घेतली.
तुम्ही नकारात्मक का पसरवत आहात? असा सवाल करत या प्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू असून सर्व दोषी पोलिसांना निलंबित केल्याचं धस यांनी सांगितलं. तसंच माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं जात आहे आणि त्यावरच ट्रायल सुरू असल्याचा आरोपही धस यांनी केला. ते म्हणाले, मी म्हणलं की, व्हिज्यूअलमध्ये दिसतात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा. पण जे दिसत नाहीत, ज्यांनी लाठीमार केला नाही, त्या पोलिसांना थोडसं माफ करा."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.