
Belagavi News : बेळगाव महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथे भाजपचे नगरसेवक मंगेश पवार व जयंत जाधव यांचे सदस्यत्व प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टनावर यांनी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. ही कारवाई पत्नींच्या नावे लिलावातून गाळे घेतल्याचे करण्यात आली आहे. तर प्रादेशिक आयुक्तांच्या या आदेशामुळे महापालिकेतील सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे.
महापालिकेत सत्ताधारी भाजपचे 35 नगरसेवक असून आता 2 दोघांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यामुळे महापालिकेत भाजपचे संख्याबळ आता 33 वर आले असले तरीही दोन अपक्ष नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा आहे. यामुळे भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही. याचबरोबर तीन पदसिद्ध सदस्यांची मते देखील भाजपच्या बाजूने आहेत. यामुळे सध्यातरी भाजपच्या सत्तेला कोणताच धोका नाही. पण प्रादेशिक आयुक्तांच्या या निर्णयाच्या विरोधात दोन्ही नगरसेवक न्यायालयात जाणार का, याबाबत मात्र उत्सुकता आहे.
प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टनावर यांच्या आदेशानुसार, येथील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील खाऊ कट्टा असून जयंत जाधव व मंगेश पवार यांनी आपल्या अधिकारांचा गैर फायदा घेतला. त्यांनी आपल्या पत्नींच्या नावे लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन दोन गाळे मंजूर करून घेतल्याचे उघड झाले आहे. याचप्रकरणी भाजपचे नगरसेवक मंगेश पवार व जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
जाधव यांनी पत्नी सोनाली जाधव यांच्या नावे तर पवार यांनी पत्नी नीता पवार यांच्या नावे गाळा घेतला. यामुळे कर्नाटक महापालिका कायद्याचा भंग झाल्याचा आरोप करत सुजित मुळगुंद यांनी केला होता. मुळगुंद यांनी याबाबत प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीवरून प्रादेशिक आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्याच अहवालावरून प्रादेशिक आयुक्तांनी प्रादेशिक आयुक्तांनी दोन्ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
तर आयुक्तांनी याप्रकरणी सुवानणी घेत दोन्ही नगरसेवकांचे म्हणणे ऐकूण घेतले होते. पण नगरसेवक झाल्यानंतर गाळा बंधणकारक असतानाही ते परत केले नाहीत. दोन्ही नगरसेवकांविरोधात कर्नाटक महापालिका कायदा 1976 च्या कलम 26 उपकलम (1) (क) अंतर्गत प्रादेशिक आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून दोन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले. तसेच प्रभाग क्रमांक 23 व 41 या दोन्ही जागा रिक्त असल्याचे जाहीर केले आहे.
पुढील आठवडाभरात बेळगाव महापौर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा महापौरपद सामान्य प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून भाजपकडून महापौर पदासाठी मंगेश पवार व जयंत जाधव या दोघांची नावे चर्चेत होती; पण या दोघांचीही नगरसेवक पद रद्द झाले आहे. पण याआधी दोघांनी आयुक्तांच्या आदेशाच्या विरोधात न्यायालयातून स्थगिती मिळवल्यास त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण पवार व जाधव न्यायालयात जाणार का? याची प्रतीक्षा बेळगावकरांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.