Ambadas Danve Appeal For Rally News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Rally : सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होवू शकतो, पण शांतते या..

Marathwada : सभेला येणारे कार्यकर्ते, पदाधिकारी व सामान्य नागरिकांनी शांतते, कुठल्याही घोषणा न देता सहभागी व्हावे.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : महाविकास आघाडीची उद्या (रविवारी) होणारी जाहीर सभा ही विराट आणि प्रचंडच होणार आहे. पण काही समाजविघातक लोकांकडून आपल्या सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होवू शकतो. त्यामुळे आपण शांततेत, कुठल्याही घोषणा न देता, हुल्लडबाजी न करता या, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी समाज माध्यमाद्वारे केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पहिली संयुक्त `वज्रमुठ`, सभा उद्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत आहे. (Shivsena) किराडपुरा भागात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कडक अटी व नियमांचे बंधन घालत पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी व काॅंग्रेचे राज्यातील नेते या संयुक्त सभेसाठी उद्या शहरात दाखल होणार आहेत.

दानवे यांनी सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होवू शकतो, अशी शंका व्यक्त करतांनाच सभेला येणारे कार्यकर्ते, पदाधिकारी व सामान्य नागरिकांनी शांतते, कुठल्याही घोषणा न देता सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मार्गदर्शन करणार आहेत.

सभेसाठी संपूर्ण मराठवाड्यातून लोक येणार असून त्याचे व्यवस्थित व शिस्तबद्ध असे नियोजन करण्यात आले आहे. आज शिवसेना नेते सुभाष देसाई, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार अनिल परब, सुनिल प्रभू यांनी सभेच्या स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

हे नेते राहणार उपस्थितीत

सभेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार संजय जाधव, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकचव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे, खासदार फौजिया खान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT