Hingoli Loksabha News : खासदार पाटील यांना आधी उमेदवारीसाठी अन् मग विजयासाठी झगडावे लागणार..

Marathwada Politics : भाजपने मतदारसंघावर दावा सांगितल्यामुळे पाटील अधिच चिंतेत आहेत.
Mp Hemant Patil Reaction News, Hingoli
Mp Hemant Patil Reaction News, HingoliSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : राज्यातील सत्तातंरानंतर उदयास आलेले नवीन समीकरण आणि त्यातून झालेले अनेक प्रश्न पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारीसाठीच झगडावे लागणार असे चित्र आहे. शिंदे गट म्हणजेच आताची मुळ (Shivsena) शिवसेना आपल्या विद्यमान खासदारांपैकी कितीजणांना परत उमेदवारी देवू शकेल याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे. कारण शिवसेना-भाजप युतीमध्ये कधीच न लढलेल्या आणि सध्या तिथे शिंदे गटाचे खासदार असलेल्या जांगावार भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Mp Hemant Patil Reaction News, Hingoli
Subshash Desai On Rally : आधी विकास करून दाखवा, मग `गतीमान सरकार` म्हणा..

एवढेच नाही तर राज्य व देशपातळीवरील भाजपच्या नेत्यांनी मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. (Hingoli) त्यामुळे विद्यमान खासदार असूनही उमेदवारी मिळणार की नाही? ही चिंता अनेक खासदारांना सतावत आहे. यापैकीच एक म्हणजे (Hemant Patil) खासदार हेमंत पाटील. भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला असला तरी त्यावर काहीही प्रतिक्रिया न देण्याचे आपल्याला मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

सत्तातंरानंतर राज्यात झालेल्या विधान परिषद व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील निकालाने सत्ताधारी शिंदे-फडणवीसांना चांगलाच धक्का बसला. महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील काही मतदारसंघात महाविकास आघाडी शिंदे-भाजप युतीला भारी पडणार आहे. सत्तातंरानंतरच्या हिंगोली जिल्ह्यावर नजर टाकली तर खासदार व औंढा-कळमनुरीचे आमदार हे दोघेही शिंदेंसोबत म्हणजेच सत्तेत आहे.

या शिवाय हिंगोली लोकसभा मदारसंघात येणाऱ्या सहा पैकी तीन मतदारसंघात भाजपचे, तर उर्वरित दोन मतदारसंघात काॅंग्रेस, राष्ट्रवादी व एका मतदारसंघात शिंदे गटाचा विद्यमान आमदार आहे. भाजप आणि शिंदे गटाची युती असल्याने मतदारसंघात आघाडीच्या तुलनेत त्यांचे पारडे जड दिसते. परंतु लोकसभेला उमेदवार कोण असले? यावर पुढचे गणित अवलंबून असणार आहे. या मतदारंघात मतदारांनी कायम आलटून-पालटून सगळ्याच राजकीय पक्षांना संधी दिली आहे. परंतु सर्वाधिक पाचवेळा शिवसेनेने येथे विजय मिळवलेला आहे.

काॅंग्रेसने तीनवेळा तर राष्ट्रवादीला देखील एकदा लोकसभेत जाण्याची संधी हिंगोलीकरांनी दिली होती. २००९ मध्ये शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी राष्ट्रवादीच्या सुर्यकांता पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला होता. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युतीने दुसऱ्यांदा हिंगोलीतून वानखेडे यांना उमेदवारी दिली. पण काॅंग्रेसच्या राजीव सातव यांनी त्यांचा अवघ्या १६२९ मतांनी पराभव केला. मोदी लाटेत काॅंग्रेसने मिळवलेला हा विजय देशात चर्चेचा विषय ठरला होता. २०१९ मध्ये वानखेडे शिवसेनेकडून पुन्हा लढण्यास इच्छूक असतांना पक्षाने हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली.

Mp Hemant Patil Reaction News, Hingoli
Bhumre On Mahavikas Aghadis Rally : एकट्या उद्धव ठाकरेंकडून मैदान भरणार नाही, म्हणून तीन पक्षांची सभा..

उमेदवारी नाकारली म्हणून वानखेडे यांनी थेट काॅंग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. पण हा निर्णय वानखेडेंच्या अंगलट आला आणि त्यांचा तब्बल २ लाख ७७ हजार मतांनी पराभव झाला. पक्षविरोधी भूमिका तेव्हा हिंगोलीकरांनी अमान्य करत वानखेडेंना घरचा रस्ता दाखवला होता. आता विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंचा हात धरला आहे. त्यामुळे हिंगोलीकर त्यांच्या या निर्णयाला मान्यता देतात? की मग वानखेडेंप्रमाणे त्यांनाही घरी बसवतात हे लवकरच स्पष्ट होईल.

भाजपने मतदारसंघावर दावा सांगितल्यामुळे पाटील अधिच चिंतेत आहेत, तर दुसरीकडे भाजपने हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केलेले व या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात सक्रिय झालेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. ते मतदार संघातील रहिवासी असल्याने त्यांना प्राधान्य देण्याचा भाजप गांभीर्याने विचार करत आहे. विविध कार्यक्रमांना हजेरी, केंद्र व राज्यांच्या योजनांचा लाभ सामान्यापर्यंत पोचवण्यासाठी ते अनेक उपक्रम राबवत आहेत. वैयक्तिक संपर्क वाढवण्यावर देखील सुमठाणकर यांनी भर दिला आहे.

Mp Hemant Patil Reaction News, Hingoli
Society Election News : टोपेंच्या पाथरवाला गावात राष्ट्रवादी-शिंदे-भाजप गटात राडा..

या शिवाय माजी आमदार रामराव वडकुते देखील लोकसभा लढवण्यास इच्छूक आहेत. राज्यातील सत्तातंरात हिंगोली जिल्ह्याची भूमिका महत्वाची राहिली आहे. खासदार आणि एकमेव आमदाराने बंड केल्यामुळे मतदारसंघात या दोघांविरोधात नाराजीचे वातवरण आहे. बांगर यांनी तर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान करतांना पक्ष बदलला होता. या सगळ्या घटना हिंगोलीकरांच्या मनात घर करून आहे. अशावेळी खासदार हेमंत पाटील यांना आधी उमेदवारीसाठी आणि नंतर विजयासाठी झगडावे लागणार असेच चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com