Dr.Bhagwat Karad News Sarkarnama
मराठवाडा

Dr. Bhagwat Karad Promised: आदर्श पतसंस्थेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार..

Jagdish Pansare

Dr. Bhagwat Karad Meeting News : आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांना दिलासा देणारी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी दिली आहे. (Adarsh Society Scam News) ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर परत देण्यासाठी आदर्शच्या मालमत्ता विकण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

त्यानूसार या बैठकीमध्ये आदर्श पतसंस्थेच्या मालमत्ता विक्री, सुरक्षित कर्जाचे इतर बँकेत हस्तांतरण करणे, आणि कर्जाची तत्काळ वसुली करण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. (Dr.Bhagwat Karad) आदर्श पतसंस्थेच्या दोन मालमत्तांची बाजार भावाप्रमाणे बारा कोटी रुपये किंमत असून ही सर्व प्रॉपर्टी विक्री करून ठेवीदारांना पैसे मिळवून द्या, (Scam)असे स्पष्ट आदेश कराड यांनी दिले.

आदर्श पतसंस्थेमध्ये ५४ हजार १२८ ठेवीदारांच्या एकूण ३५३.५८ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यामध्ये २५ हजार रुपये ठेवी असलेल्यांची संख्या ही ३६ हजार ७८१ इतकी आहे. (Aurangabad) संस्थेच्या मालकीच्या दोन मालमत्ता असून त्यांची किंमत अनुक्रमे ८.५ कोटी, ३.५ कोटी रुपये इतकी आहे. बाजारभावाप्रमाणे मालमत्तांची स्वतंत्र विक्री करण्यात येणार असून त्यातून ठेवीदारांचे पैसे परत दिले जाणार आहेत.

याशिवाय सुरक्षित कर्जाचे इतर सार्वजनिक बँकेत हस्तांतरण करावे. यामध्ये किमान शंभर कोटी रुपयांचे सिक्युअर लोन असून हे लोन इतर बँकांनी हस्तांतरित करण्यासंदर्भात सहमती दर्शवली असल्याचेही कराड यांनी कळवले आहे.आदर्श पतसंस्थेच्या पिशोर येथील साडेआठ कोटी रुपये आणि नाचनवेल येथील साडेतीन कोटी रुपये किमंतीच्या मालमत्तांची बाजारभावाप्रमाणे विक्री करण्यात येणार आहे.

त्यानंतर सहकार विभागाकडून ठेवीदारांना पैसे देण्याविषयी कारवाई केली जाईल, असे प्रशासक काकडे यांनी सांगितले. आदर्श नागरिक पतसंस्थेमध्ये एकूण कर्जदारांची संख्या ११९० असून त्यापैकी पाच लाखापर्यंत कर्ज असलेल्या कर्जदारांची संख्या १६६२ इतकी आहे. पाच लाखावरील कर्जदारांकडून २१.५६ कोटी आणि पाच लाखांवरील ३२८ कर्जदारांकडून २५०.९५ कोटी येणे बाकी आहे.थकीत कर्जाच्या वसुली संदर्भातही पोलिसांनी कारवाई करावी,असे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT