Parbhani BJP Executive Committee : `पार्टी विथ डीफरन्स` मध्ये चालतोय फक्त नेत्यांचा `रेफरन्स`..

BJP Politics News : पक्ष कार्यापेक्षा लोकप्रतिनिधींची मर्जी व रेफरन्स हाच महत्वाचा निकष असल्याने त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
BJP Executive Committee News
BJP Executive Committee NewsSarkarnama

Marathwada Political News : भारतीय जनता पक्ष हा `पार्टी विथ डिफरन्स` चे बिरूद मिरवतो. मात्र परभणी जिल्हा कार्यकारिणी निवडताना पार्टी विथ डिफरन्स मध्ये फक्त नेत्यांचा `रेफरन्स` आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. (BJP News) परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी नुकतीच पक्षाची दीडशे सदस्य असलेली जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.

BJP Executive Committee News
Jalna Maratha Protest : उपोषण संपले पुढे काय ? सरकार जीआर बदलणार का ?

यामध्ये अनेक नवख्या कार्यकर्त्यांना संधी दिली असली तरी वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्याना डावलण्यात आल्याने अस्वस्थता दिसून येत आहे. (Parbhani) जिल्ह्यातील पक्षाचा दलित चेहरा असलेले सोनपेठचे शिवाजीराव मव्हाळे यांना दीडशे जणांच्या यादीत कुठेही स्थान दिले गेले नाही.

महिला मोर्चाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या (BJP) मानवत येथील डॉ. शरयू खेकाळे यांच्या नावाचाही यादीत समावेश नाही. (Marathwada) तसेच पूर्णा येथील कार्यकर्ते व धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अनंत बनसोडे यांची निमंत्रित सदस्य म्हणून बोळवण करण्यात आली आहे.

पाथरी तालुकाध्यक्षपदी पांडुरंग नखाते तर मानवत तालुकाध्यक्षपदी विकास मगर यांची निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही तालुकाध्यक्ष पाथरी मतदारसंघाचे माजी आमदार मोहन फड यांच्या खास मर्जीतील असून ते इंद्रायणी मित्र मंडळामध्ये सक्रीय होते.

पदाधिकारी निवडताना भाजपची पारंपारिक वोटबँक असलेल्या तसेच लोकसभेच्या दृष्टीने दोन लाखापेक्षा जास्त मतदार असलेल्या ब्राह्मण, जैन व माहेश्वरी समाज यांच्यापैकी कोणालाही प्रतिनिधित्व दिल्याचे दिसून येत नाही. एकूणच `पार्टी विथ डिफरन्स` मध्ये पक्ष कार्यापेक्षा लोकप्रतिनिधींची मर्जी व रेफरन्स हाच महत्वाचा निकष असल्याने येणाऱ्या काळात त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com