Aditi tatkare.jpg Sarkarnama
मराठवाडा

Aditi Tatkare Convoy Accident : मोठी बातमी! महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

Deepak Kulkarni

Nanded News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झंझावती दौरे, बैठका, मेळावे, यांनी महाराष्ट्र पिंजून काढत आहे.

यात महायुती सरकारमधील मंत्री आदिती तटकरे याही पायाला भिंगरी लावून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.अशातच एक बुधवारी मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला. ही घटना नांदेड शहरातील आसना बायपास परिसरात घडला.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.ज्या गाडीला अपघात झाला,त्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी बसले होते असे बोलले जात आहे.

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या भोकर येथील कार्यक्रम आटोपून नांदेड विमानतळाकडे येत असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातात सुदैवाने राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) पदाधिकारी सुखरुपपणे बचावले.कोणीही जखमी झालेले नाही.मात्र, फॉर्च्युनर गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

तटकरे यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर ही गाडी डिव्हायडरच्या खड्ड्यामध्ये उतरली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.नांदेड येथे झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर होत असलेल्या टीकेवरुन विरोधकांना खडेबोलही सुनावले. त्या म्हणाल्या, सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. याचा आनंद महिलांना आहे, म्हणूनच पहिल्या दिवसापासून विरोधकांना ते खटकतं आहे. माता- भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद बघवत नाही म्हणून विरोधक टीका करत असल्याची टीका मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT