Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis: एकीकडे फडणवीसांसोबत शाब्दिक चकमकी अन् तिकडे अनिल देशमुखांच्या मुलाने मानले मुनगंटीवारांचे आभार...

Saleel Deshmukh Social Media Post : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अनिल देशमुख यांच्या सध्या टोकाचा वाद सुरू आहे.
Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Anil Deshmukh, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना देशमुखांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी भाजपचे नेते तसेच राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

सोबतच त्यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाचा गलिच्छपणाचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावर टीकाही केली. सध्या देशमुखांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून वेगवेगळे तर्क आणि अर्थ लावल्या जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अनिल देशमुख यांच्या सध्या टोकाचा वाद सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपल्यावर फडणवीस यांनी दबाव टाकला होता असा आरोप देशमुखांनी अलीकडेच केला होता. फडणवीस यांनी देशमुखांचा एक पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचे सांगून योग्य वेळी तो जाहीर करण्याचा इशारा त्यांना दिला होता.

याचदरम्यान, देशमुखांवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचा सलील देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला होता. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, खुशाल चौकशी करा असे सांगून त्यांनी भाजप नेत्यांना उघडपणे आव्हाण दिले होते.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Eknath Shinde News : ...अन् क्षणातच डॅशिंग, कणखर मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यात अश्रू तरळले!

भाजप आणि अनिल देशमुखांमध्ये (Anil Deshmukh) शाब्दिक वादावादी सुरू असताना बुधवारी (ता.7) सलील देशमुख यांनी काटोल तालुक्यातील केदारपूरच्या पर्यंटन विकासासाठी 2 कोटी 30 लाख रुपये मंजूर केल्याने सुधीर मुनगंटीवार यांची मुक्तकंठाने प्रशंसा करून जाहीर आभारही मानले आहे.

सलील देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये कुठलेही कटकारस्थान न करता, संकुचित विचार न करता मोठ्या मनाने हा निधी आपण उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानले आहे. आज महाराष्ट्रातील राजकारणात जो गलिच्छपणा आला आहे त्याला आपण छेद दिलात.

गेल्या अनेक दिवसांपासून आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल काटोलच्या जनतेच्यावतीने देशमुखांनी मनुगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Ajit Pawar : 'मुख्यमंत्री करणार हे मला सांगायचं, मी पार्टीच आणली असती', अजित पवारांची टोलेबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com