Aditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत काहीसा गोंधल पाहायला मिळाला. आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरू झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. आदित्य ठाकरेंकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची विनंती करण्यात आली. या गोंधळानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. रमाबाईंची मिरवणुकीतील डिजे थांबवल्यामुळे दगडफेक झाल्याचे समजते.
गोंधळ निर्माण झाला तेव्हा औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी दोन्ही बाजूंना शांततेचं आवाहन केलं. आदित्य ठाकरे म्हणाले, "बाहेर भीमशक्तिचा एक मोर्चा सुरू आहे. हा मोर्चा नीट होऊ द्या. म्युझिक लावायचं असेल तर लावा, डिजे लावला तरी काही हरकत नाही. पण एक गोष्ट आहे की, शिवशक्ति आणि भिमशक्ती वाद नकोय. आपण एकत्र आलोय. आपल्या देशासाठी एकत्र आलो आहे. "
"एकमेकांना समजून घ्यावं लागतं. काही कारणामुळे त्यांना थांबवण्यात आलं असेल, त्यांची मी माफी मागितली. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, शिवशक्ति आणि भिमशक्ती एकत्र आली आहे. मी संविधानासाठी लढतोय. काही अडचण झाली असेल तर मी माफी मागतो. पण एवढं मोठं कारण नाही, डिजे पाच सहा मिनिटासाठी बंद गेलं असेल. पण मी म्हणाले की, डिजे चालू द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.