Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड पिसाळलेले; त्यांच्या बापजाद्यांची हीच भूमिका का?; नरेंद्र पाटलांचा घणाघात

NCP News : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवरही साधना निशाणा
Narendra Patil
Narendra PatilSarkarnama

Narendra Patil News : मुंब्र्यात भोंग्याचा आवाज वाढल्याने जितेंद्र आव्हाड पिसाळले आहेत. ते स्वत:च कोण हे विसरलेले असल्याचे गंभीर वक्तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलंय. जितेंद्र आव्हाड घेत असलेली भूमिका त्यांच्या बापजाद्यांची पण आहे का, असा सवालही नरेंद्र पाटील यांनी यावेळी केला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर घणाघात केला. तसेच आव्हाड यांच्या वक्तव्यांवरून पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला.

Narendra Patil
Shivraj Patil Chakurkar News : युवकांची शक्तीच कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देईल..

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या वक्तव्यांचा नरेंद्र पाटील यांनी समाचार घेतला. आव्हाड यांनी जिजाऊंनी महिलांवरील अत्याचार पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना महिलांवरील अत्याचाराविरोधात माहिती दिली. त्यांना तयार करुन प्रशिक्षीत केले.

त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. तेव्हा अफजलखान, शाईस्तेखान भारताबाहेर होते, अशी वक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सहमत आहेत का, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Narendra Patil
Shivsena News : मोठी बातमी : ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला कोणत्याही क्षणी अटक होणार?

जितेंद्र आव्हाड जी भूमिका घेताहेत ती त्यांच्या बापजाद्यांची आहे का, असा सवाल करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हानही पाटील यांनी यावेळी केलं आहे. नाहीतर त्यांनी आव्हाडांना उत्तर मागावे, असे आवाहन केले. तसेच त्यांचीही तीच सर्वांची भूमिका असेल तर आडनावे बदलावीत, अशी टीकाही नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, गोरख शिंदे, रवी शिंदे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com