crop insurance
crop insurance  Sarkarnama
मराठवाडा

बीडच्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून दिवाळी गिफ्ट; ५७ कोटी रुपये बॅंक खात्यात जमा

सरकारनामा ब्यूरो

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा (crop insurance) कंपनीने दिवाळीच्या एक दिवस अगोदर गोड बातमी दिली आहे. जिल्ह्यातील २६ महसूल मंडलातील जवळपास दीड लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर तब्बल ५७ कोटी २९ लाख रुपये पीक विमा अग्रीम रक्कम म्हणून जमा करण्यात आली आहे. उर्वरीत ११ मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील ८ दिवसांत अग्रीम रक्कम जमा होणार आहे. (Advance deposit of 57 crore crop insurance on accounts of one and half lakh farmers in Beed)

शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. मात्र, विमा कंपनी विविध निकष लावत असल्याने विमा मिळेल की नाही? या चिंतेत शेतकरी होते. मात्र ऐन दिवाळीत अग्रीम देऊन काही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न विमा कंपनीने केला आहे.

बीड जिल्ह्यातील ४५ महसूल मंडलांपैकी केवळ २६ महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीम देणार असल्याचे विमा कंपनीने म्हटलंय. या २६ पैकी १५ महसूल मंडलातील १ लाख ४९ हजार ४०२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल ५७ कोटी २९ लाख ४९ हजार ५०० रुपये पीकविमा अग्रिम म्हणून जमा करण्यात आला आहे. उर्वरित ११ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील ८ दिवसांत अग्रीम जमा होणार आहे.

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रिम संदर्भात अधिसूचना काढल्यानंतर एका महिन्याच्या आत संबंधित विमा कंपनीने निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पीकविमा कंपनी असलेली ‘बजाज अलायन्झ’ने सर्व शेतकऱ्यांना अग्रिम देणे अपेक्षित होते. मात्र २६ पैकी केवळ १५ महसूल मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा अग्रिम जमा करण्यात आला आहे. दरम्यान उर्वरीत १९ महसूल मंडलातील लाखो शेतकरी या पीकविमा अग्रीमपासून वंचित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT