घोडगंगा निवडणूक : आमदार अशोक पवारांना भाजप फराटेंच्या नेतृत्वात देणार टक्कर

मागील वेळी तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे विरुध्द माजी आमदार तथा अध्यक्ष अशोक पवार अशी लढत होऊनही २१ : ०० अशी एकहाती सत्ता पवारांनी कारखान्यात कायम राखली होती.
Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil Farate
Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil FarateSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे (Baburao Pacharne) यांच्यासारखे प्रबळ विरोधक असूनही आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना तब्बल २५ वर्षे आपल्या हातून निसटू दिला नव्हता. आता मात्र विरोधकांकडून निकराच्या लढाईची भाषा वापरली जात आहे. दरवेळी पाचर्णेंच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी लढाई लढली गेली. या वेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे (Dada Patil Farate) हे टक्कर देणार आहेत. त्यामुळे पाचर्णेंच्या पश्चात दादा पाटील हे सर्वशक्तीमान असलेल्या अशोक पवारांशी कसे लढतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. (Ghodganga factory election: MLA Ashok Pawar is challenged by Dada Patil Farate)

निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ ते २७ आक्टोबरदरम्यान घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या एकुण १०१ इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अंतिम यादी जाहीर होऊन २८ आक्टोबर रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे, तर ६ नोव्हेंबर रोजी मतदान आणि ७ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल.

Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil Farate
शिवसेनेतून हकालपट्टीनंतर क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘त्यात गैर काय...?’

कोरोना आणि न्यायालयीन लढाईत लांबलेल्या कारखान्याच्या यावर्षीच्या निवडणुकीत विरोधकांना काहीही करुन अशोक पवारांना कारखान्यात रोखायचे आहे. पवारांची एकछत्री कार्यपद्धती, कारखान्यावरील कर्जाच्या आकड्यांबाबत विरोधकांचे आक्षेप, निवडणूक पुढे ढकलण्यावरून व तत्सम अनेक वाद हे थेट उच्च न्यायालयात जाऊन दोन्ही बाजूंनी एकमेकांना जोखण्याचे प्रकार गेल्या पाच वर्षांपासून सुरूच आहेत. त्यातच बहुतांश विरोधक हे भाजपला मानणारे व थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क असणारे आहेत. राज्यातील सत्ता बदलामुळे या निवडणुकीत रंगत भरणार आहे. अर्थात सत्ता बदलाची चुणूक मागील महिन्यात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही सामान्य मतदारांना अनुभवायला मिळाली. त्यामुळे महाआघाडीतील सर्व पक्ष व प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजप व शिंदे गट असा सामना घोडगंगाच्या निवडणुकीत रंगण्याची चिन्हे आहेत.

Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil Farate
पहिला आसूड उद्धव ठाकरेंवरच चालवला पाहिजे : रावसाहेब दानवेंचे उत्तर

मागील वेळी तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे विरुध्द माजी आमदार तथा अध्यक्ष अशोक पवार अशी लढत होऊनही २१ : ०० अशी एकहाती सत्ता पवारांनी कारखान्यात कायम राखली होती. यावेळी मात्र पाचर्णेंच्या पश्चात ही संपूर्ण धुरा माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांच्यावर असणार आहे. त्यांच्या सोबतीला माजी संचालक पांडूरंग थोरात, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तथा माजी संचालक सुधीर फराटे, अ‍ॅड. सुरेश पलांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, काका खळदकर, राहुल गवारे, आबासाहेब गव्हाणे, राहुल बाबुराव पाचर्णे, अरविंददादा ढमढेरे, कॉंग्रेसचे जिल्हा नेते महेशबापू ढमढेरे असे अनेक दिग्गजांची नेत्यांची फौज असणार आहे.

Ghodganga election : Ashok Pawar-Dada Patil Farate
धनंजय मुंडेंनी बांधावरूनच लावला सचिवांना फोन अन्‌ म्हणाले...

ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून प्रतिष्ठेची केली गेल्यास माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या एकत्रित व्यूहरचनेमुळे ही लढत विरोधकांसाठीही कठीण जाणार हे नक्की. तरीही गेल्या अडीच वर्षांतील अनुभव पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या निवडणुकीत लक्ष घातल्यास ही लढत लक्षवेधी ठरणार, यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com