Mp Imtiaz Jalil News,Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil On Atique, Ashraf Shot Dead : अतिक, अश्रफच्या हत्येनंतर इम्तियाज म्हणाले, जंगलराजमध्ये तुमचे स्वागत..

Aimim : गुरुवारी अतिक अहमदचा मुलगा असद व त्याचा साथीदार गुलाम याचे युपी पोलिसांच्या पथकाने एन्काॅंऊटर केले होते.

सरकारनामा ब्युरो

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात दोन दिवसांपुर्वी गॅंगस्टर अतिक अहमदच्या मुलासह त्यांच्या साथीदाराचे पोलिसांनी एन्काॅउंटर केले होते. या कारवाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतांनाच काल रात्री अतिक अहमद (Atique Ahemad) आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असतांना एमआयएमने या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

खासदार इम्तिायज जलील (Imtiaz Jalil) यांनी या संदर्भात एक ट्विट करून या हल्लाबद्दल संशय व्यक्त केला आहे. `लोकशाहीच्या मातृभूमीतील जंगलराजमध्ये तुमचे स्वागत`, अशा शब्दात केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

एवढेच नाही तर `सत्यपाल मलिक यांच्या स्फोटक मुलाखतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. (Aimim) त्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण आल्यानंतर लेगच अतिक आणि अश्रफ यांची गोळ्या घालून हत्या झाली`. या दोन घटनांचा काही संबंध तर नाही ना? अशी शंका देखील इम्तियाज जलील यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केली आहे.

काल रात्री उशीरा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतांना त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोद आहे.

तत्पुर्वी गुरुवारी अतिक अहमदचा मुलगा असद व त्याचा साथीदार गुलाम याचे युपी पोलिसांच्या पथकाने एन्काॅंऊटर केले होते. यावर देखील एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत योगी सरकारवर गंभीर आरोप केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT