Atique Ahmed news: आतिक आणि अश्रफची हत्या का केली? हल्लेखोरांनी सांगितलं धक्कादायक कारण...

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी (१५ एप्रिल) माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली.
Atique Ahmed news:
Atique Ahmed news:Sarkarnama

Atique Ahmed news : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी (१५ एप्रिल) माफिया अतिक अहमद (Atique Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली. पोलीस वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी दोन्ही भावांची गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी पोलिस चौकशीत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. इतकेच नव्हे तर अहमद यांच्या हत्येचे कारणही सांगितलं आहे. (Why were Atique and Ashraf killed? The attackers said the shocking reason...)

बांदा येथील रहिवासी लवलेश तिवारी, हमीरपूर येथील रहिवाशी अरुण मौर्य आणि कासगंज येथील रहिवासी सनी अशी या हल्लेखोरांची नावे आहेत. या तिघांच्या विरोधात यापुर्वी काही किरकोळ गुन्हे दाखल झाले होते.पण देशातल्या कुख्यात गुंडामध्ये, माफियामध्ये आपलंही नाव सामील व्हावं,अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते काहीतरी मोठं करण्याची संधी शोधत होते. अतिकच्या विरोधात वातावरण असून त्याची हत्या करून त्यांना मीडिया कव्हरेज मिळेल, असे त्यांना वाटत होते. यामुळे त्यांचे नाव क्षणार्धात देशभर पोहोचेल. यामुळेच त्यांनी आतिक अहमद आणि त्याच्या भावाला मारण्याचा प्लॅन बनवला होता.

Atique Ahmed news:
Uttar Pradesh : मोठी बातमी! गँगस्टर अतिक अहमद अन् अश्रफ अहमदचा गोळीबारात मृत्यू

याशिवाय या आरोपींनी अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, पोलिसांनी त्याच्या वक्तव्यावर विश्वास न ठेवता त्याच्या स्थानिक पोलिसांकडून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. याशिवाय गावातील पोलिसांच्या बीट अधिकाऱ्याच्या माध्यमातून या हल्लेखोरांची माहिती मिळविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. (Uttar Pradesh News)

यावेळी अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येपेक्षा दुसरी कोणतीही घटना मोठी असू शकत नाही. मात्र, पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेल्या जबाबात अनेक विरोधाभास आहेत. त्यामुळे पोलीस या विधानांची पडताळणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.या तिघांनी शनिवारी रात्री उशिरा मोतीलाल नेहरू रुग्णालयाबाहेर अतिक अहमद आणि अशरफ यांची वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना गोळ्या झाडून हत्या केली होती. पत्रकारांच्या रुपात आलेल्या या चोरट्यांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून ही घटना घडवली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com