Bjp  Leader Pankaja Munde
Bjp Leader Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर राडा, पोलिसांचा हुल्लडबाजांवर लाठीचार्ज

सरकारनामा ब्युरो

Pankaja Munde| परळी : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहेत. दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर पंकजा मुंडेंसोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी झुंबड उडाली. काही हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी लोकांना धक्काबुक्की केल्याने वातावरण चांगलेच बिघडले. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत हुल्लडबाजांना काठीचा चोप दिला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा सर्व सण साजरे होत आहेत. परळीतही आज पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला पण या पंकजा मुंडेंचे भाषण संपताच मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले, काही कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंसोबत सेल्फी घ्यायचा होता. म्हणून भाषण संपताच ते व्यासपीठाकडे निघाले पण काही कार्यकर्त्यांनी अडवल्यामुळे तिथेच त्यांची बाचाबाची झाली. काही मिनिटातच वातावरण चिघळले. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखत हुल्लडबाजांवर लाठीचार्ज केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान पंकजा मुंडेचे भाषण सुरु झाले तेव्हाच काही तरुण गोंधळ घालत होते. तेव्हाच पंकजा मुंडेंनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण त्यांचे भाषण संपल्यानंतंर चांगलाच राडा झाला. दसरा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना पंकजा मुंडेंनी आपल्याला पद मिळाल नाही म्हणून मी नाराज नाही, असंही सांगितलं.

'आपल्या लोकांना वाटतं आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं. पण मी जेव्हापासून २०१९ मध्ये पडले तेव्हापासून आपल्या ताईला अमुक तमुक मिळावं, आपल्या नेत्याला वाटत आपल्या नेत्याला काही तरी मिळावं. मी २०१९ ला पडले तेव्हापासून आपल्या ताईला काहीतरी मिळावं असं लोकांना वाटतं, पण मला नाही मिळाल तरी मी नाराज नाही. कोणीही पदाची अपेक्षा करायची नाही. आपल्याला जे मिळालं आहे ते समाजाची ताकद वाढवण्यासाठी मिळाल आहे. पण समाजाच्या भिंंती बांधण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा नाही. मला पद मिळालं नाही तरी माझी तक्रार नाही. असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT