Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama

Pankaja Munde : "हो मी वारसा चालवते, पण मुंडेंचा नाही तर.." पंकजा मुंडे गरजल्या !

Pankaja Munde : वारसा, वंशवाद यावरून पंकजा मुंडेंनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केले होते.
Published on

बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) दसरा मेळाव्यात (Dasara Melava) काय बोलणार याची सर्वांनी उत्सुकता होती. "मला वारसा चालवता म्हणता? पण मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. मुंडेंनी ज्यांच्या विचारांचा झेंडा हाती घेतला, ज्यांच्या वारसा चालवला, त्या पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचा मी वारसा चालवते. उपाध्यायांचा वारसा ज्या अटलवबिहारी वाजपेयींनी घेतला होता, त्यांचा वारसा मी चालवते. हो मी वारसा चालवते," असे मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडेंनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्याबाबत एक विधान केले होते. मोदी (Narendra Modi) यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणीही संपवू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. कारण मी तुमच्या मनावर राज्य केले, असे मुंडे म्हणाल्या होत्या. यावरच त्यांनी आज दसरा मेळाव्यात सूचक स्पष्टीकरण दिले.

दसरा मेळाव्यात मुंडे पुढे म्हणाल्या, मेळावा म्हटलं तर वेगवेगळे आरोप होत राहतात, चिखलफेक होते. हा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. चिखल तुडवणे आणि संघर्ष करणे हे आमच्या रक्तातच आहे. जे गोपिनाथ मुंडेंचे विरोधक होते, जे माझे विरोधक होते, त्यांन टीका केली. मी कधी खालच्या पातळीवर टीका केली का ? कधी संधीसाधूपणा केला नाही. ते कधी आमच्या रक्तात नाही.

Pankaja Munde
Pankaja Munde Live : पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

"हकीकत को तलाश करना पडता है, अफवा ये तो घर बैठे बैठे मिल जाती है, हीच हकीकत आहे, असेही पंकजा मुंडे सूचकपणे म्हणाल्या.

Pankaja Munde
तुमच्यासाठी खुर्च्या ठेवण्याची माझी ऐपत नाही: पंकजा मुंडेचा टोला कोणाला?

दरम्यान, भगवान भक्तीगडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्या निमित्त खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वाहन फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. जागोजागी कार्यकर्त्यांनी डॉ. मुंडे यांचे जंगी स्वागत केले. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्‍चात भगवान गडावर राजकीय भाषण नाही, अशी भूमिका गडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com