Uddhav Thackeray News, Mla Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News
Uddhav Thackeray News, Mla Santosh Bangar News, Hingoli Latest Marathi News Sarkarnama
मराठवाडा

ठाकरेंच्या आश्वासक शब्दानंतर हिंगोलीतील शिवसैनिक ठाम, बांगरांचे शक्तीप्रदर्शन फसणार...

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : कळमनुरीचे बंडखोर आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अचानक कोलांटउडी मारली. बांगर यांच्या बंडाने उद्धव ठाकरे व शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला. परंतु या धक्क्यातून सावरत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधत त्यांना धीर दिला. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, आपण नव्याने पक्ष उभारू, लवकरच मी तुमच्या भेटीला येईन, अशा शब्द ठाकरेंनी दिला.(Hingoli Latest Marathi News)

यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा आधार मिळाला आणि (Santosh Bangar) आमदार बांगरांनी बंडखोरी केली असली तरी जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना ही ग्वाही दिली. त्यामुळे बांगर जरी शिंदे गटाच्या गळाला लागले असले तरी जिल्ह्यातील शिवसेना फोडण्यात त्यांना यश आलेले नाही.

त्यामुळे शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश आल आहे, स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते त्यांनी अनेक वेळा फोनवरून शिवसैनिक व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासोबत संवाद देखील साधला होता.

हिंगोली जिल्ह्यातील सहा पैकी पाच तालुकाप्रमुख सर्व उपजिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याची माहिती आहे. या सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची, उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईमध्ये बैठक संपन्न झाली असून पुढच्या काही दिवसात हिंगोलीत शिवसेनेचा नवा जिल्हाप्रमुख जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पक्षप्रमुखांनी सांगितल्याचे समजते.

एकंदरित आमदार बांगर यांच्या बंडानंतरही जिल्ह्यातील शिवसेनेचे फारसे नुकसान होणार नाही, याची काळजी पक्षनेतृत्वाने घेतल्याचे दिसते. त्यामुळे आज मुंबईत बांगर आपल्या एक हजार समर्थकांसह करणारे शक्तीप्रदर्शन फसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT