संजय शिरसाठ म्हणाले, `आता फक्त एकनाथ शिंदे हेच नेते`

बंडखोर आमदार संजय शिरसाठ म्हणतात आम्ही घेतलेला निर्णयच योग्य.
Sanjay Shirsath
Sanjay ShirsathSarkarnama

नाशिक : गुरुपोर्णीमा जवळ येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena) आम्हाला गुरुस्थानी आहेत. मात्र आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. ते जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल, असे सांगून बंडखोर आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांचे नेतृत्व अमान्य केले आहे. (Rebel MLA said, We are firm, no confusion about political ideology)

Sanjay Shirsath
मला मंत्री करा, असे एकनाथ शिंदेंना कधीही म्हटलो नाही!

आमदार संजय शिरसाठ, संजय बांगर तसेच राज्यात होणारे रस्ते अपघात याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर टिका होते आहे. या पार्श्वभूमीवर एका वाहिनीच्या प्रतिनिधीशी श्री. शिरसाठ बोलत होते.

Sanjay Shirsath
रविकांत तुपकरांच्या धडक आंदोलनाने महावितरण हादरले!

ते म्हणाले, खासदार संजय राऊत हे शिवसेना संपलेले आहेत. त्यांना कोणाशी काय बोलावे, कसे बोलावे हेच कळत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्याची दखल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घेतली पाहिजे. रस्ते अपघात होने किंवा कोणी आजारी पडणे हे कोणाच्याही हातात नसते. मात्र त्यावरून श्री. राऊट टिका करतात. यावर राऊत कदाचीत उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टिका करू शकतील. ज्यांच्यामुळे तुम्ही आहात, त्यांच्याविषयी तरी चांगले बोललं पाहिजे.

कोणी अडचणीत, संकटात असेल तर त्याची विचारपूस केली पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. सहानुभूती दाखवली पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. मात्र संजय राऊत यांची तशी संस्कृती नसावी. जोपर्यंत शिवसेना संपत नाही, तोपर्यंत ते तसेच बोलत राहणार. त्यांनी कदाचीत सुपारी घेतली असावी, असे दिसते असे श्री. शिरसाठ म्हणाले.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले आहे. त्याला बंडखोरांचा काहीही प्रतिसाद मिळणार नाही. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले आहे. त्यामुळे आमच्यात कोणतिही अस्वस्थता नाही. आम्ही शविसेनेचे आहोत व त्यावर ठाम आहोत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com