Shivsena UT Beed News  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UT Beed News : जाधवांच्या हकालपट्टीनंतर आता रत्नाकर शिंदे बीडचे नवे जिल्हाप्रमुख..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhre) यांच्यावर पैसे देवून पदे विकत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांना मारहाण केल्याचा दावा हकालपट्टी झालेले जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला होता. (Shivsena UT Beed News) यामुळे एकच खळबळ उडाली होती. महाप्रबोधन यात्रेपुर्वीच हा वाद चव्हाट्यावर आल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अंधारेंवर आरोप करणाऱ्या जाधव यांची तात्काळ जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यानंतर लगचे या पदावर रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केज, अंबाजोगाई, परळी, वडवणी, धारूर, माजलगाव या कार्यक्षेत्राची त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Beed News) केज येथील शिंदे हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. (Shivsena) गेल्या २७ वर्षापासून ते कार्यरत आहेत. केजचे तालुका प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती.

नुकत्याच झालेल्या महाप्रबोधन यात्रेला बीडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. (Uddhav Thackeray) संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी नव्याने जिल्ह्यातील संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे गटबाजी, वाद टाळत बीड शहर व ग्रामीण भागात ठाकरे गटाची ताकद वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नाकर शिंदे यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.

सुषमा अंधारे यांच्यावर अप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले होते. अंधारे कशासाठी देखील पैसे मागत असून आपण त्यांना दोन चापट मारल्याचा दावा जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून केला होता. तसेच अंधारे त्यांच्या कार्यालयातील एसी, फर्निचरसाठी पैसे मागतात, पक्षातील पदे विकत असून आपले पद देखील त्यांनी विक्रीला काढल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT