Minister Uday Samant-Cm Thackeray
Minister Uday Samant-Cm Thackeray Sarkarnama
मराठवाडा

पोटनिवडणुकीतील विजयानंतर फटाके फोडायला चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही येणार

जगदीश पानसरे

नांदेड ः देगलूर-बिलोलीची पोटनिवडणूक होणे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला छेद दे भाजपने ती आपल्यावर लादली आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात दुःखद प्रसंगामुळे पोटनिवडणुका झाल्या तेव्हा सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे ती जागा संबंधित पक्षाला सोडली आहे. त्या कुटुंबातील व्यक्तीला बिनविरोध निवडून आणले आहे. स्व. आर.आर.पाटील, पंतगराव कदम यांच्या निधनानंतर त्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली.

पण भाजपने पंढरपूर नंतर पुन्हा देगलूर-बिलोलीत उमेदवार देत ही निवडणुक आपल्यावर लादली. पण महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीत देगलूरच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांच्या सोबत आपण देखील फटाके फोडायला जाणार असल्याचे सांगितले आहे, असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विजयाची खात्री दिली.

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा आदर्श प्रचार पाहिल्यानंतर अशोक चव्हाण यांचा पॅटर्न कोकणात राबवण्याचा मी विचार करत असल्याचे देखील सामंत म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सामंत बोलत होते.

शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुभाष साबणेंचा देखील सामंत यांनी समाचार घेतला, गद्दारांना धडा कसा शिकवायचा हे आमच्या कोकणातल्या लोकांना चांगलेच समजते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मतदार गद्दाराला धडा निश्चित शिकवतील, असेही सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, पंढरपूरची पोटनिवडणूक लागली तेव्हा देखील भाजपने बाहेरच्या व्यक्तीला पक्षात घेऊन उमेदवारी दिली. देगलूरमध्ये पुन्हा तोच प्रकार घडला. पण चिंता करण्याचे कारण नाही, महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

जितेशचे टेक आॅफ होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच आमची बैठक घेतली, संपर्कप्रमुखांनी या संदर्भात माहिती दिलीच आहे. पण बैठकीच्या शेवटी त्यांनी जे सांगितले ते महत्वाचे आहे. पोटनिवडणुकीती विजयाची खात्री असल्यामुळे विजयाचे फटाके फोडण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी देखील अशोक चव्हाणांसोबत उपस्थित राहील, असे त्यांनी सांगितले आहे.

मतदारांनी स्व.रावसाहेब अंतापूरकर यांनी कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून जी सेवा केली, लोकांची काळजी घेतली, हे करत असतांना त्यांनाच कोरोनाने आपल्यापासून हिरावून नेले याची जाणीव ठेवून जितेशला निवडून दिले पाहिजे.

बीटेक असलेल्या जितेशचे या निवडणूकीत टेक आॅफ होणार हे निश्चित आहे. पण जे भाजपचे लोक येऊन तुमच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना एका पेट्रोल-डिझेल आणि हजारांवर गेलेले गॅस सिलेंडर याबद्दल जाब विचारा, असे आवाहन देखील सामंत यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT