Hingoli News : नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेली बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बैठकीत खासदार संजय जाधव काजू-बदाम खात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहेत. ‘शेतकरी उपाशी, लोकप्रतिनिधी तुपाशी’ असा आरोप केला जात असतानाच आता कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौराच वादात साडपला आहे. त्यांनी सर्व सामान्य शेतकऱ्याच्या बांधावर न जाता एका बार अँड रेस्टॉरंट मालक असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात पाहणी केली आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती अंत्यत गंभीर झाली असून जनावरांना पाणी नाही की शेतीला पाणी. यामुळे पीक वाया गेलं आहे. यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. यावरून सरकारवर विरोधक टीका करत आहेत. दरम्यान आता नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ज्यात मराठवाड्यातील तब्बत ७० तालुक्यांचा आढावा घेण्यात आला.
मात्र याच बैठकीत शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. याच बैठकीत खासदार संजय जाधव यांचा काजू-बदाम खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं असून विरोधकांकडून महायुती सरकारला धारेवर धरत टीका केली जातेय.
यावर आता खासदार जाधव यांचे स्पष्टीकरण समोर आले असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी, एकीकडे काजू-बदाम आमच्यासमोर आलेच नाहीत. आम्ही ते पाहिलेही नाहीत. जर कोणी खाल्ले असतील तर ते शुगर पेशंट असतील, असे म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील त्यांचाच दुष्काळ पाहणी दौरा वादात सापडला आहे. भरणे यांनी चक्क एका बार अँड रेस्टॉरंट मालक असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात कोरड्या दुष्काळाची पाहणी केली आहे. राहुल गंगाधर त्रिमले असे या बार रेस्टॉरंट मालक असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
वसमत तालुक्यातील टाकळगाव परिसरातील गट नंबर 168 मध्ये त्यांची ही शेती आहे. धक्कादायक म्हणजे पोळा सणाच्या दिवशी हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील अल्पभूधारक महिला शेतकरी, कमलबाई कांदे यांनी अर्धा लिटर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. तिथे मात्र शेतकऱ्यांशी संवाद न साधता सोयीचा दौरा करत मंत्री महोदयांनी बार अँड रेस्टॉरंट मालकाच्या शेतात पाहणी केली आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान यावरून साम टीव्हीच्या पत्रकाराने त्यांना थेट सवाल करताच ते चांगलेच संतापल्याचे दिसले. त्यांनी आम्ही सगळ्यांचे आहोत. माझ्या दृष्टीने तो शेतकरी महत्वाचा आहे. माझ्यासाठी शेतकरी एकच आहेत. कोण... काही नाही. तर हा दौराच शेतकऱ्यांसाठी असून रात्र होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.