Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : सावकारी जाचातून शेतकऱ्यांची सुटका होणार; कशी, ते कृषीमंत्री मुंडेंनी सांगितलं

Union Budget 2024 : शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय व काळानुरूप शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाबत संतुलन साधले

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी मात्र केंद्राचा हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताच्या दृष्टीने दमदार पावलं टाकणार, देशाला आर्थिक महाशक्तीच्या मार्गावर नेणारा असल्याचे सांगत मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्राच्या शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये काही महिन्यापूर्वी सहभागी झालेल्या राष्ट्रवादीचे (अजित पवार) राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही केंद्राचा अर्थसंकल्प चांगलाच भावला. शेतकऱ्यांसाठी बळ देणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय व काळानुरूप शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाबत संतुलन साधले आहे.

आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी पत आराखडा 20 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारित करण्याच्या घोषणेमुळे लाखो शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज प्रणालीचा फायदा होणार आहे. यामुळे त्यांची खासगी सावकारीपासून सुटका होण्यास मदत होईल. शेतीपूरक उद्योगांसाठी अधिकचे भांडवलही या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक शेतीला बळ देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आल्यामुळे 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच ग्राहकांनाही विषमुक्त अन्न उपलब्ध होणार असल्याचे मुंडेंनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साठवणूक सुविधांवर भर दिल्याने शेतकऱ्यांना शेतमाल योग्य भाव आल्यावर बाजारात विकणे शक्य होणार आहे. शेतीसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची क्रांतिकारी घोषणा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना सुयोग्य माहिती आणि साधनसामग्री सहजासहजी उपलब्ध होणार आहे. मार्केट इंटलिजन्स स्टार्ट अप सपोर्ट उपलब्ध होणार असल्याचे सांगत या अर्थसंकल्पाचे (Budget) स्वागत करतो, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT