Nirmala Sitharaman Speech : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024-25 या वर्षासाठीचा अंतरिम बजेट सादर करताना, मोदी सरकारच्या कार्यकाळातील सकारात्मक बाबींवर लक्ष वेधले आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचे प्राधान्यक्रम आणि धोरणांवर सीतारमण यांनी प्रकाश टाकले. आपल्या 56 मिनिटांच्या संबोधनात त्यांनी मोदी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख केला आहे. (Latest Marathi News)
निर्मला सीतारमण यांनी मांडलेले महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे मोदी सरकारच्या नवा 'जीडीपी'चा संकल्प आहे. सीतारमण यांनी उल्लेख केलेल्या जीडीपीचा अर्थ 'जी म्हणजे 'गुड गव्हर्नन्स', 'डी म्हणजे डेव्हलोपमेंट' आणि 'पी म्हणजे परफॉर्मन्स' असा अर्थ आहे. जीडीपीच्या या त्रिसूत्रीवर मोदी सरकारची वाटचाल राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात वापरलेल्या काही ठराविक शब्दांची चांगलीच चर्चा आहे. ग्यान (Gyan), एफडीआय, जीडीपी या अर्थसंकल्पीय संज्ञाचा मोदी सरकारने खुबीने वापर केला आहे. अर्थशास्त्रात उच्चारले जाणाऱ्या या अर्थांना मोदी सरकारने आपल्या परिने अर्थ लावले आहेत. ग्यान (Gyan) या शब्दाचा अर्थ म्हणजे गरीब , तरुण, अन्नदाता (शेतकरी) आणि नारी (महिला) यांचा विकास, असा केला गेला आहे
"मोदी सरकारची धोरणे आणि सुरक्षा योजनांद्वारे आर्थिकदृष्ट्या वंचितांना सक्षम बनवण्याचा आणि तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांना प्रभावी उपाययोजना करणार असल्याचे जाहीर केले आहे. अन्न सुरक्षा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण, शेतक-यांचे उत्पन्न वाढवणे हे सरकारचे प्राधान्य असेल,' असे सीतारमण म्हणाले.
सीतारमण यांनी आपल्या भाषणात 'एफडीआय'चा (FDI) अर्थ फर्स्ट डेव्हलप इंडिया असा केला आहे, ही रणनीती भारताच्या तसेच सर्व भारतीयांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करेल आणि त्या बदल्यात भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे ध्येय गाठण्यात मदत करेल, असे सीतारमण यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.