Beed News : नव्या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे यांच्याकडे कृषिखात्याचा पदभार आला आहे. खातेवाटप झाले अन् अधिवेशन सुरू झाले. दुसरीकडे, मराठवाड्यातील अनेक भागात सोयाबीन आणि कपाशीवर गोगलगायींनी हल्ला चढवला आहे. कृषिमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीडच्या दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी गोगलगायींमुळे प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी शेवार गाठले. शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांन कृषी सचिवांना फोन लावत नुकसानभरपाईबाबत चर्चा केली. (Agriculture Minister Dhananjay Munde reached farme ....directly Phoe called to secretary)
कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज बीड (Beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यातील बेलंबा, वाघबेट शिवारातील गोगलगायींनी बाधित झालेल्या सोयाबीन, कपाशी आदी पिकांची पाहणी केली. गोगलगायींमुळे होत असलेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे केले जावेत, याबाबत संबंधितांना आदेश दिले आहेत. त्याचबरोबर गोगलगायींना नष्ट करण्यास उपयुक्त असणारी औषधे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कृषी विभागास उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना दिली आहे.
मुंडे यांनी शेतातून थेट सचिवांना फोन लावला. ते म्हणाले की, माझ्या परळी मतदारसंघातील काही भागात सोयाबीन आणि कपाशी पिकाचे क्षेत्र गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात बाधीत झाले आहे. माझ्यासोबत बीडच्या जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी आहेत. मला तुमचा एक आदेश लागेल. एकतर या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. किमान पावसामुळे काही ठिकाणी पेरलेलं उगवलंच नाही. पाऊस पडतच नाही. गोगलगायींच्या संदर्भात मागे नांदेड व इतर परिसरासाठी आदेश काढला होता. तसा तो बीडलाही काढला तर आपल्याला या अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्यांना काहीतरी मदत जाहीर करता येईल.
यावर्षी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीची गरज भासल्यास किंवा अन्य कोणत्याही अडचणीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही कृषिमंत्री मुंडे यांनी दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची शेतकऱ्यांना गावोगाव जाऊन माहिती देणाऱ्या वाहनास या वेळी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. उर्वरित कालावधीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा भरून घ्यावा, असे आवाहनही कृषिमंत्री मुंडे यांनी शेवटी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.