Ajit Pawar Vs Jitendra Awhad : अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवरील राग अजूनही जाईना...

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गोटातील आमदारांनाही दादांनी निधी दिला आहे. त्यात जयंत पाटलांचाही समावेश आहे.
Ajit Pawar-Jitendra Awhad
Ajit Pawar-Jitendra AwhadSarkarnama

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना अर्थमंत्री अजित पवार यांनी सढळ हस्ते निधीचे वाटप केले आहे. बंडात साथ देणाऱ्या आमदारांबरोबरच शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांनाही अजितदादांनी निधी दिला आहे. अगदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनाही निधी मंजूर केला आहे. मात्र, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना निधी दिलेला नाही, त्यामुळे दादांचा आव्हाडांवरील राग अजून गेला नाही का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Ajit Pawar's anger against Jitendra Awhad still not gone... )

अर्थमंत्रालयाचा कारभार हाती येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना २५-२५ कोटी रुपयांच्या निधीची खैरात केली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गोटातील आमदारांनाही दादांनी निधी दिला आहे. त्यात जयंत पाटलांचाही समावेश आहे. तसेच, शिंदे गट आणि भाजपतील आमदारांना भरघोस निधी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारांच्या निधीसाठी अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Ajit Pawar-Jitendra Awhad
Ajit Pawar News : अजित पवारांच्या निधीवाटप कौशल्याचे जयंत पाटलांना भारी कौतुक...!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपैकी कळवा-मुंब्य्राचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना मात्र निधी मंजूर करण्यात आलेला नाही. आणखी काही आमदारांनाही निधी मिळालेला नाही, असे एका दैनिकाने म्हटलेले आहे. पण, अजितदादांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावरील राग अजूनही गेलेला दिसत नाही. कारण, अजित पवार यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी आव्हाड यांनी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या समोर अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या.

Ajit Pawar-Jitendra Awhad
Jayant Patil On Ajitdada's CM Post: अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर जयंत पाटलांचे भाष्य; म्हणाले, ‘सध्याच्या गणितात...’

त्याचवेळी नवी मुंबईतील नितीन हिंदुराव देशमुख यांनीही अजित पवार हाय हाय, अजित पवारांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे दादांनी देशमुखांशीही अबोला धरला होता. मात्र, देशमुख यांनी गेल्या वर्षी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वर्तमानपत्रात ‘दोन हाणा;पण मला आपलं म्हणा’ अशा मजकुराची जाहिरात देत जाहीरपणे माफी मागितली होती.

Ajit Pawar-Jitendra Awhad
Ajit Pawar News : मानलं अजितदादांना ! एका झटक्यात राष्ट्रवादी-शिंदेंच्या आमदारांना २५-२५ कोटी वाटले...

राष्ट्रवादीतील फुटीनंतरही अजित पवार यांनी केलेल्या पहिल्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. ‘ठाण्याचा तो पठ्ठ्या, असा उल्लेख करत त्यांच्यामुळे किती लोक पक्ष सोडून गेले आहेत, त्यांची यादीच पवारांनी वाचली होती. एकीकडे पक्ष फुटीनंतर आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत प्रत्येक दौऱ्यात दिसून येत आहेत, तर दुसरीकडे दादांचा मात्र त्यांच्यावर अजूनही राग असल्याची चर्चा आज पुन्हा एकदा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com