Sambahji Patil Nilangekar Allegation Babasaheb Patil in Ahmadpur News Sarkarnama
मराठवाडा

Sambahji Patil Nilangekar : अहमदूपरमध्ये जे घडले त्याचा बदला घ्या! सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी धोका दिल्याचा संभाजी पाटलांचा आरोप!

MLA Sambhaji Patil Nilangekar On Minister Babasaheb Patil : भाजप कार्यकर्त्यांचा हा अपमान आहे, याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आमच्या स्थानिक नेत्यांनी एका दिवसात पॅनल तयार केले आणि आता आपण स्वबळावर लढत आहोत.

Jagdish Pansare

  1. भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या ‘धोका’ बद्दल संताप व्यक्त करत अहमदपूरमध्ये राजकीय बदला घेण्याचा इशारा दिला.

  2. दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष उघडपणे तापला असून स्थानिक राजकारणात मोठी हालचाल झाली आहे.

  3. या संघर्षाचा आगामी निवडणूक समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Ahmadpur Local Body Election : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठवाड्यात अनेक ठिकाणी संघर्ष झडू लागला आहे. महायुतीचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी धोका दिल्याचा आरोप करत भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर चांगलेच संतापले. अहमदपूरमध्ये युती असताना सहकार मंत्र्यांनी धोका दिला, त्याचा बदला घ्या, असे आवाहन निलंगेकर यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परळी वगळता राज्यात इतर ठिकाणी महायुती होऊ शकली नाही. अहमदपूरमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि भाजपचे नेते बसवराज पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात बैठक झाली होती. सहकार मंत्र्यांनी युतीत लढू असे सांगितले, जागा वाटप अंतिम झाले. भाजपने संभाव्य उमेदवारांची यादी आणि एबी फाॅर्म दिले. परंतु ऐनवेळी सहकार मंत्र्यांनी सगळे उमेदवार अन् फाॅर्म काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दारात नेऊन उभे केले.

भाजप कार्यकर्त्यांचा हा अपमान आहे, याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आमच्या स्थानिक नेत्यांनी एका दिवसात पॅनल तयार केले आणि आता आपण स्वबळावर लढत आहोत. आता माघार नाही, अपमान करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले. या निवडणुकीत भाजपाला साथ द्या, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आम्ही तन-मन-धनाने तुमच्या पाठीशी उभे राहू.

लातूरमधून दहा हजार कार्यकर्त्यांची फौज अहमदपूरमध्ये आणा, निवडणूक होईपर्यंत त्यांना इथे काम करायला सांगा, पण झालेल्या अपमानाचा बदला कोणत्याही परिस्थिती घेतला गेलाच पाहिजे, असे म्हणत संभाजी पाटील यांनी सहकार मंत्र्यांनी दिलेल्या धोक्याबद्दल संताप व्यक्त केला. संभाजी पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अहमदपूरमधील राजकीय वातावरण तापले आहे.

अहमदपूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी युती होण्यासाठी दोन-तीन वेळा बैठका झाल्या. सहकार मंत्र्यांनी युतीची तयारी दाखवली, सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर धोका दिल्याचा आरोप करत संभाजी पाटील निलंगेकर आता इरेला पेटल्याचे चित्र आहे. युती फिसकटल्यानंतर भारतीय जनता पार्टीने एक नगराध्यक्ष व 18 नगरसेवक पदासाठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. बाबासाहेब पाटलांनी शेवटच्या क्षणी धोका दिल्यामुळे भाजपला संपूर्ण पॅनल उभे न करता आल्याची सल निलंगेकर यांच्या मनात आहे.

5 FAQs (Marathi)

1. संभाजी पाटील निलंगेकरांनी नेमका कोणावर आरोप केला?
त्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी धोका दिल्याचा आरोप केला.

2. निलंगेकरांनी ‘अहमदपूरमध्ये बदला’ का म्हटले?
स्थानिक पातळीवरील राजकीय निर्णयांमध्ये झालेल्या फसवणुकीचा त्यांनी हवाला दिला.

3. या वादाचा भाजपवर काय परिणाम होऊ शकतो?
भाजपमध्ये अंतर्गत तणाव वाढू शकतो आणि निवडणूक समीकरणे बदलू शकतात.

4. बाबासाहेब पाटील यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे का?
या लेखात ती माहिती उपलब्ध नाही, पण राजकीय प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

5. अहमदपूरमध्ये हा संघर्ष किती तीव्र आहे?
स्थानिक पातळीवर हा वाद गंभीर असून मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT