Nilangekar Meet Babasaheb Patil : निलंगेकरांच्या नाराजीच्या नुसत्याच चर्चा, मंत्री बाबासाहेब पाटलांची भेट घेऊन केले अभिनंदन..

Former Minister Nilangekar met Minister Babasaheb Patil-congratulated and gave best wishes : बाबासाहेब पाटील यांना मंत्रीमंडळ विस्तारात शपथविधीसाठी फोन आल्याचे कळताच अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला होता. मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे महायुतीतील तीनही पक्षांनी ठरवल्यामुळे हे घडले.
Sambhajipatil Nilangekar Meet Minster Babasaheb Patil News
Sambhajipatil Nilangekar Meet Minster Babasaheb Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : काल नागपूरमध्ये झालेल्या महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्तार शपथविधीचे साईड इफेक्ट दिसू लागले आहेत. (Winter Assembly Session) राष्ट्रवादीचे माजीमंत्री छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आणि ते अधिवेशन सोडून निघून गेल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजीमंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रीपदासाठी फोन न आल्याने कालच नागपुरातून काढता पाय घेतल्याच्या चर्चा आहेत. भाजपचे माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मी नाराज नाही असे सांगत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

इकडे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात भाजपच्या इच्छुकांना मंत्रीपद मिळाले नसले तरी (Sambhajipatil Nilangekar)माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तोंडातून अवाक्षरही काढले नाही. समर्थक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडियावर नाराजी व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असल्या तरी त्या त्यांच्या भावना आहेत. माजीमंत्री तथ विधानसभेच्या निलंगा मतदारसंघाचे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज विधीमंडळ अधिवेशनाला हजेरी लावत कामकाजात सहभाग नोंदवला.

Sambhajipatil Nilangekar Meet Minster Babasaheb Patil News
NCP Politic's-video : मंत्रिमंडळातील एक जागा कोणासाठी रिक्त ठेवली?....राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट नावच घेत डेडलाईनही सांगितली...

एवढेच नाही तर मंत्रीपद न मिळाल्याची कुठलीही नाराजी व्यक्त न करता किंवा अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदारा बाबासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचा आकस न बाळगता त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीने माजीमंत्री संजय बनसोडे यांना बदलत पहिल्यांदाच अहमदूपरला मंत्रीपदाची संधी दिली. बाबासाहेब पाटील यांना मंत्रीमंडळ विस्तारात शपथविधीसाठी फोन आल्याचे कळताच अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला होता.

Sambhajipatil Nilangekar Meet Minster Babasaheb Patil News
Mahayuti Government : आमचं सरकार हे EVM चं सरकार! देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

मात्र नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे महायुतीतील तीनही पक्षांनी ठरवल्यामुळे हे घडले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर लातूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर या दोघांपैकी कोणाच नंबर लागतो? याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. मात्र आपल्या पक्षाच्या आमदारांना धक्कातंत्राचा वापर करत फडणवीसांनी लातूरचे मंत्रीपद मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला दिले.

Sambhajipatil Nilangekar Meet Minster Babasaheb Patil News
MLA Sambhaji Patil Nilangekar : संभाजी पाटील निलंगेकरांच्या मंत्रीपदासाठी निळकंठेश्वराला अभिषेक

मंत्रीपदासाठी निलंगेकर-पवार यांच्यात स्पर्धा असल्यामुळेच ते बाबासाहेब पाटील यांच्यारुपाने अहमदपूरला दिले गेले, अशीही चर्चा आहे. परंतु या सगळ्या चर्चांना संभाजी पाटील निलंगेकर यांनी नवनिर्वाचित मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेत पुर्णविराम दिला. राजकारणातला दिलदारपण म्हणतात तो हाच, असे या निमित्ताने म्हणावे लागेल. निवडणुक प्रचारा दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते.

Sambhajipatil Nilangekar Meet Minster Babasaheb Patil News
Maharashtra BJP President: बावनकुळेंची जागा कोण घेणार? चव्हाण, कुटे, निलंगेकर, शिंदे, मुनगंटीवार रेसमध्ये...

पण जातीय समीकरणे, राज्याच्या प्रत्येक विभागाला मंत्रीमंडळात स्थान देण्याची कसरत यामुळे अनेकदा ही आश्वासने पाळली जात नाहीत. असेच संभाजी पाटील निलंगेकर यांच्या बाबतीत घडले असावे. कुठलीही नाराजी व्यक्त न करता निलंगेकर यांचा विधीमंडळातील वावर, प्रत्येक मंत्र्यांशी असलेला संवाद त्यांच्यातील परिपक्व राजकारण्याचे गुण दर्शवत होते.

Sambhajipatil Nilangekar Meet Minster Babasaheb Patil News
BJP News : राणेंची 'शांतीत क्रांती'; पण फडणवीसांच्या 'ढाण्या वाघा'ची मंत्रिपदाची संधी यंदाही हुकली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आता फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचीही निलंगेकर यांनी भेट घेतली. विशेष म्हणजे निलंगा मतदारसंघातील जनआशिर्वाद यात्रेच्या वेळी बावनकुळे यांनीही तुम्ही फक्त निलंगेकर यांना निवडून द्या, मंत्री करण्याची जबाबदारी माझी, असा शब्द दिला होता. पण राजकारणात कधीकधी शब्द पाळायचे नसतात, हे माहित असल्यानेच निलंगेकर यांनी त्यांच्या भेटीत यांची जराशीही जाणीव बावनकुळे यांना होऊ दिली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com