Ahmadpur Municipal Council News : नुकत्याच झालेल्या अहमदपूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या शाहू कांबळे यांचे नुकतेच ह्दयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. नगरसेविका झाल्याचा आनंद नियतिने हिरावून घेतल्याचा भावना त्यांच्या प्रभागातून व्यक्त केल्या जात आहे. वेळेवर उपचार न मिळू शकल्याने त्यांची प्राण ज्योत मावळल्याचे बोलले जातं आहे.
2017 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शाहू कांबळे यांचा अवघ्या 12 मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना विजय मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पहाटे छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना अहमदपूर शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतू ते बंद असल्याने, नातेवाईकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तिथे जाण्यास उशीर झाल्यामुळे कांबळे यांचा मृत्यू झाला.
शाहूताई कांबळे यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारात सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेतला होता. गेल्या निवडणुकीतही शाहू कांबळे यांनी आपले नशीब आजमावले होते. परंतु तेव्हा त्यांचा अवघ्या 12 मतांनी पराभव झाला होता.
पराभवानंतरही शाहू कांबळे या पक्षाचे काम निष्ठेने करत राहिल्या. त्यामुळे पक्षाने यावेळी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली होती. विजयाचा आनंद त्यांच्या कुटुंबात आणि समर्थकांमध्ये होता. पण अचानकपणे मृत्यूने शाहू कांबळे यांच्यावर झडप घातली.
काल पहाटे शाहूताई कांबळे यांना अचानक छातीत दुखू लागले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी अहमदपूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, ते बंद असल्याने तासभर उपचारासाठी त्यांना फिरावे लागले. अखेर त्यांना अहमदपूरच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.