Latur Election: भाजपला निष्ठावंतांचा असाही दणका! 28 जणांनी कायम ठेवली अपक्ष उमेदवारी

Latur Election: लातूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात याच पक्षातील निष्ठावंतांनी दंड थोपटले आहेत.
BJP leaders preparing for Zilla Parishad elections as the party announces interview schedule for aspirants across Kolhapur district during ongoing municipal polls.
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Latur municipal corporation election: लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात याच पक्षातील निष्ठावंतांनी दंड थोपटले आहेत. 28 ठिकाणी त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून, पक्षात आयाराम आणि दुसऱ्या प्रभागातून लादलेल्या उमेदवारांच्या विरोधात हा अजेंडा असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान काही ठिकाणी निष्ठावंताचे बंड शमविण्यात त्या त्या उमेदवारांना यश आल्याचे दिसून येत आहे.

BJP leaders preparing for Zilla Parishad elections as the party announces interview schedule for aspirants across Kolhapur district during ongoing municipal polls.
राजभवन ते शेत! राज्यपालांनी हाती धरला नांगर, ज्वारीची पेरणी अन्...

महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात उमेदवारी देण्यावरून बंडाळी उडाली आहे. पक्षाच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करीत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची गुरुवारी येथे बैठक झाली होती. त्यात शहरातील विविध प्रभागात उमेदवारी दाखल केलेले उमेदवारांसह निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना उमेदवारी देणे, प्रभागातील उमेदवाराऐवजी प्रभागाशी संबंध नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देणे असे आरोपही पक्षश्रेष्ठींवर करण्यात आले होते. तसेच प्रत्येक प्रभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सर्वच प्रभागात हे निष्ठावंत उमेदवार राहणार का? याकडे लक्ष लागले होते.

BJP leaders preparing for Zilla Parishad elections as the party announces interview schedule for aspirants across Kolhapur district during ongoing municipal polls.
Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! अपघातग्रस्ताच्या कुटुंबियांना १.३ कोटींची नुकसान भरपाई; हेल्मेट नसल्याचा दावा फेटाळला

दरम्यान, शुक्रवारी सकाळी अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा संबंधितांना निरोप देण्यात आले. पण एकापेक्षा जास्त उमेदवार आपलेच राहणार नाहीत याची काळजी घेण्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे येथे 70 पैकी 28 ठिकाणी या उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आयाराम व लादलेल्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

BJP leaders preparing for Zilla Parishad elections as the party announces interview schedule for aspirants across Kolhapur district during ongoing municipal polls.
Shivsena-MNS Manifesto: शिवसेना-मनसेचा वचननामा आला समोर! शहर वाचवण्याचं आवाहन, मुंबईकरांसाठी मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे

महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असून, त्यांच्यात मोठा असंतोष आहे. त्यामुळे 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी असणार आहे. आयाराम व लादलेल्या उमेदवारांच्या विरोधात त्यांचा प्रचार असेल, असे माजी नगरसेवक व संयोजक निष्ठावंत कार्यकर्ता आघाडीचे नितीन शेटे यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com