Chhatrapati Sambhaji Nagar : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव भागातील घरात आश्रय देणाऱ्या एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला काल रात्री नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले.
निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी मतीन पटेल यांच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने त्याचे वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस व छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.
नाशिक पोलीस मतीनच्या अटकेचे वॉरंट घेऊन संभाजीनगर येथे आले होते. परंतु काल शहरात राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आलेले असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस व्यस्त होते. त्यामुळे सायंकाळी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पथक नारेगाव परिसरात दाखल झाले. त्यांनी मतीन पटेलचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आणि रात्री नाशिक पोलिसांचे पथक त्याला घेऊन रवाना झाले. आज मतीन पटेल याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
टीसीएस कंपनीतील पीडित महिलांचे लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रयत्न याप्रकरणी संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, तौसीस अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख, अश्विनी चैनानी, निदा खान यांच्या विरोधात देवळाली कॅम्प व मुंबई नाका पोलिसांनी नऊ गुन्हे दाखल केले आहेत. सध्या हे संशयित जामिनावर बाहेर आहेत.
दरम्यान या लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतरण प्रकरणात एमआयएमचे नेतेही रडारवर असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन संशयीतांना अटक केल्यापासून एमआयएम पक्षाची काही नेते सातत्याने त्यांची पाठराखण करीत होते. त्यामुळे या नेत्यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.