Imtiaz Jaleel On BJP Sarkarnam
मराठवाडा

Imtiaz Jaleel On BJP : 'हिंदू आमच्यामुळे सुरक्षित, लोकांचा माइंड सेट केलाय'; इम्तियाज जलील यांचा भाजपच्या 'कट्टरते'वर हल्लाबोल

AIMIM Imtiaz Jaleel Criticizes BJP Hindutva Extremism in Chhatrapati Sambhajinagar : 'AIMIM' महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या कट्टरतावाद देशासह महाराष्ट्रासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

Pradeep Pendhare

BJP Hindutva extremism : 'AIMIM' महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या कट्टरतावादावर हल्ला चढवला.

"देशात अन् महाराष्ट्रात भाजप कट्टरतावर वाढवत आहे. ऐकवेळ अशी येईल की, त्यावेळी आपल्याकडून सर्व काही संपलेले असेल. आपल्या देशाला शांतता, अहिंसा, विकासाची विचारसरणी आहे. यातूनच देश पुढं जाणार आहे. युवक-तरुणांना, पुढं जायचं असेल, आणि त्यांच्या डोक्यातील कट्टरता काढायची असेल, तर पहिले सत्तेतून भाजपला काढावं लागेल", असं ठाम मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं.

इम्तियाज जलील यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधला. भाजपच्या (BJP) कट्टरतावादावर त्यांनी थेट हल्ला चढवला. भाजपला भाजपला एक गोष्टी कळली आहे की, देशात सत्तेत बसायचे असेल, तर आपल्याला हिंदूंमध्ये एक भावना निर्माण करायची की, आम्ही आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहे, या भाजपच्या कार्यपद्धतीवर इम्तियाज जलील यांनी लक्ष वेधले.

इम्तियाज जलील म्हणाले, "हिंदू (Hindu) आमच्यामुळे सुरक्षित आहे, हे भाजपने लोकांचा माइंड सेट केला आहे. अशिक्षित लोकांमध्ये हा विचार आल्यावर वाईट नाही वाटत, तर सुशिक्षित लोकं या विषाला बळी पडले आहेत. ते देशाला खूप घातक आहे. हे आता संपणार नाही".

...तर देशद्रोहीचा शिक्का!

'मोदी सत्तेत आहे, भाजपचे अधंभक्त त्यांच्याविरोधात ऐकणार नाही, काहीही चांगले सुचवलं, तरी ते ऐकणार नाहीत. काहीही बोललो, तर देशद्रोहीचा शिक्का मारतील. पण कधी ना कधी सत्तेतून ते खाली येतील', याचा आठवण इम्तियाज जलील यांनी भाजपला करून दिली.

हे कोणी विष पेरलं?

'कट्टरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप जेव्हा सत्तेतून खाली उतरेल, तेव्हा खूप उशिर झालेला असेल. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण झालेली असेल. इतर जातीच्या लोकांना आपल्या सोसायटीत नको, ही आपल्या महाराष्ट्राची अन् देशाची संस्कृती नाही. आज एका सोसायटीत एकत्र सण साजरे होत नाही. हे कोणी विष पेरलं?', असा सवाल करत देखील इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT