Mp Imtiaz jalil News, Aurangabad
Mp Imtiaz jalil News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aimim : इम्तियाज जलील यांनी यासाठी मानले न्यायालयाचे आभार..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका खास कारणासाठी न्यायालयाचे आभार मानले आहे. एका ट्विटचा संदर्भ देत त्यांनी आमच्या न्यायव्यवस्थेला सलाम असे रिट्वट केले आहे. गुटखा व्यापारी जे.एम.जोशी यांना न्यायालयाने (Court) मोक्का कायद्याअंतर्गत १० वर्षांची शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.

या संदर्भातील ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Aimim) आमच्या न्यायव्यवस्थेला माझा सलाम. कॅन्सर पसरवल्याबद्दल आणि बर्‍याच मृत्यूंचे कारण बनल्याबद्दल गुटखा व्यापाऱ्याने आपले उर्वरित आयुष्य आता तुरुंगात घालवावे, अशी आशा असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इम्तियाज जलील हे खासदार म्हणून काम करत असतांनाच दुआ फाऊंडेशनच्या माध्यमातून नशाबंदीसाठी देखील प्रयत्न करत आहेत. नुकताच त्यांनी शहरात मोठा महोत्सव देखील भरवला होता. या शिवाय अवैध दारू विक्री, नशा करणाऱ्यांविरुद्ध देखील त्यांनी मोहिम हाती घेतली होती.

या संदर्भात पोलिस आयुक्तांकडे निवेदन देत अनेकदा त्यांनी पाठपुरावा देखील केला. त्यामुळे नशाबंदी, दारू, गुटखा बंदीसाठी आग्रही असलेल्या इम्तियाज जलील यांनी गुटखा व्यापाऱ्याला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचे मनापासून स्वागत केले. भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अशामुळे अधिक दृढ होतो, तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक ठरेल, अशी आशाही इम्तियाज यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT